महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्य करणाऱ्या राज्यातील 12 संस्थांना अनुदान गुरुवार, २० एप्रिल, २०१७
मुंबई : सामाजिक न्याय विभागामार्फत सन 2017-18 या आर्थिक वर्षासाठी महात्मा गांधी व्यसनमुक्ती सल्ला, उपचार व पुनर्वसन केंद्र योजनेंतर्गत, महसूल विभागातून प्रत्येकी 2 संस्थांना म्हणजेच राज्यातील 12 नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांना त्यांचे व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्य लक्षात घेऊन प्रोत्साहनात्मक अनुदान म्हणून प्रत्येकी 11 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

या योजनेसाठी पात्र संस्थांनी त्यांचे प्रस्ताव दिनांक 25 मे रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण व जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

इच्छुकांनी अधिक माहितीसाठी सामाजिक न्याय विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळास भेट द्यावी, असे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, मुंबई शहर यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा