महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
‘वस्तू व सेवाकर' या विषयावर आयुक्त राजीव जलोटा'जय महाराष्ट्र'कार्यक्रमात सोमवार, १७ जुलै, २०१७
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र'कार्यक्रमात ‘जीएसटी कर प्रणाली’ या विषयावर राज्याचे वस्तू व सेवाकर आयुक्त राजीव जलोटा यांच्या मुलाखतीचा पहिला भाग प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार, दिनांक १८ जुलै २०१७ रोजी सायंकाळी ७:३० ते ८:०० या वेळेत प्रसारित होईल. ही मुलाखत जेष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी घेतली आहे.

१ जुलै २०१७ पासून वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी संपूर्ण देशभरात करण्यात आली आहे. वस्तू व सेवा कर आकारणी, सर्वसामान्यांचे वस्तू व सेवा कराविषयीचे प्रश्न, राज्यातील वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी आदी प्रश्नांची उत्तरे श्री. जलोटा यांनी 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमातून दिली आहेत.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा