महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीबद्दल मार्गदर्शन सोमवार, २२ एप्रिल, २०१९
 
 

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित  जय महाराष्ट्र  कार्यक्रमात  कशी कराल स्पर्धा परीक्षेची तयारी  या विषयावर स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ प्रा.मीनल मापुस्कर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीचा पहिला भाग दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर मंगळवार दिनांक २३ एप्रिल २०१९ रोजी रात्री ८:०० वाजता प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
 

 
 
 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे होणाऱ्या परीक्षांचे स्वरूप, परीक्षांची तयारी कशी करावी, वस्तुनिष्ठ अभ्यास कसा करावा, अवांतर वाचन म्हणजे काय, स्पर्धा परीक्षेकरिता मार्गदर्शनाची आवश्यकता, पहिली ते दहावीचा अभ्यास कसा करावा, पदवीचा अभ्यास करताना विषय कोणता असावा आदी विषयांची माहिती प्रा.मापुस्कर यांनी जय महाराष्ट्र या कार्यक्रमातून दिली आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा