महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार - नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०
 
मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 27 गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका करावी या मागणीच्या पार्श्वभूमीवर नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघर्ष समिती आणि युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या भागाच्या विकासाला प्राधान्य देण्यात येत असून नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे. या भागातील जनभावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू. त्यानंतर सकारात्मक निर्णय घेऊअसे नगरविकास मंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.

मंत्रालयात झालेल्या या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदेआमदार प्रमोद पाटीलआमदार रवींद्र चव्हाणजगन्नाथ शिंदेमाजी आमदार सुभाष भोईरनगरविकास () विभागाचे प्रधान सचिव महेश पाठकएमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त गोविंदराज यांच्यासह संतोष केणेगोपाळ लांडगेस्थायी समितीचे माजी सभापती रमेश म्हात्रेसंघर्ष समितीचे गुलाब वझेयांच्यासह कल्याण-डोंबिवली महापालिकेतील नगरसेवक आणि संघर्ष समिती व युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.

श्री.शिंदे यावेळी म्हणालेजनभावना समजून घेण्याकरिता आज बैठक घेतली आहे. 27 गावातील नागरिकांना महापालिका क्षेत्रातून वगळून स्वतंत्र नगरपालिका हवी आहे तर काहींना ही गावे महापालिकेत समाविष्ट रहावीअसे वाटते. दोन्ही बाजूंना न्याय मिळावाया भूमिकेतून आपण पुढे जाऊया, असे आवाहन श्री.शिंदे यांनी यावेळी केले.

ग्रामस्थांचे म्हणणे ऐकल्यानंतर या भागात विकास झाला पाहिजेअशी माझी भूमिका आहे. असे स्पष्ट करताना श्री.शिंदे म्हणालेमी भूमिपुत्रांच्या बाजूने असून त्यांना मूलभूत सुविधादेखील मिळाल्या पाहिजेत. शासन ग्रामस्थांच्या भूमिकेशी सुसंगत निर्णय घेईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील नागरिकांच्या मागणीचे समर्थन केले आहे. आज संघर्ष समिती आणि युवा मोर्चा तसेच ग्रामस्थांचे म्हणणे ऐकल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी लवकरच चर्चा करु. त्यानंतर या प्रकरणी जलद गतीने सकारात्मक निर्णय घेऊअशी ग्वाही श्री.शिंदे यांनी यावेळी दिली. 
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा