महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
‘जय महाराष्ट्र' व 'दिलखुलास' कार्यक्रमात 'डिजिटल व्यवहारांना चालना देणारी फास्टॅग पद्धती' या विषयावर कार्यक्रम सोमवार, ०२ डिसेंबर, २०१९


मुंबई :
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ व 'दिलखुलास' कार्यक्रमात ‘डिजिटल व्यवहारांना चालना देणारी फास्टॅग पद्धती' या विषयावर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक एम. के. वाठोरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. ३ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ७.३० वाजता प्रक्षेपित होईल. तर राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून बुधवार दि. ४ आणि गुरुवार दि. ५ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महाराष्ट्रात रस्ते विकासासाठी प्राधिकरणाचे सुरू असलेले प्रकल्प, रस्ते बांधणीमध्ये पीपीपी मॉडेल, केंद्र सरकारचे वन नेशन वन टॅग धोरण, पंधरा डिसेंबरपासून टोल फास्टॅग व्दारे स्वीकारला जाणार असून, फास्टॅग नेमके काय, फास्टॅग ची कार्यपद्धती, फास्टॅग कोठे मिळेल आणि काय कागदपत्रे लागतील, फास्टॅग चे नेमके फायदे, फास्टॅग रिचार्ज कसे करायचे आदी विषयांची माहिती श्री. वाठोरे यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा