महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
‘दिलखुलास’मध्ये उद्या ‘विज्ञान क्षेत्रातील संधी’ या विषयावर मार्गदर्शन सोमवार, २२ एप्रिल, २०१९

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास कार्यक्रमात विज्ञान क्षेत्रातील संधी या विषयावर करिअर मार्गदर्शक आनंद मापुस्कर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून मंगळवार दि. २३, बुधवार दि. २४ आणि गुरुवार दि. २५ एप्रिल रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे.

करिअरच्या दृष्टीने  विज्ञान शाखा ही एक महत्त्वाची शाखा मानली जाते. या शाखेतील करिअरच्या संधी, दहावी व बारावी नंतरचे विज्ञान शाखेतील अभ्यासक्रम, विज्ञान शाखेच्या माध्यमातून संरक्षण, कृषी, संशोधन, हॅास्पिटॅलिटी, वास्तुविशारद या क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या करिअरच्या संधी, करिअरच्या दृष्टीने आवश्यक असणारी कल चाचणी आदी विषयांची माहिती श्री.मापुस्कर यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा