महान्यूज
अंबरनाथ शहरवासियांची अंबरभरारी शनिवार, २९ ऑक्टोंबर, २०१६
अंबरनाथ या शहराला इथल्या प्राचीन शिव मंदिरामुळे एक सांस्कृतिक वारसा लाभला आहे. तसेच वेगवेगळ्या कला क्षेत्रात सुद्धा या शहरातील बरीच मंडळी कार्यरत आहेत, सुप्रसिद्ध नाटककार आणि लेखक बाळ कोल्हटकर यांच्यापासून झालेली सुरुवात आजही तितक्याच जोमाने टिकून आहे आणि इथल्या स्थानिक कलाकारांची प्रगती दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्याच बरोबरीने वेगवेगळ्या क्षेत्रात सुद्धा अंबरनाथकर आपलं तसेच आपल्या शहराचं नाव उज्ज्वल करत आहेत. काहीतरी अभिनव असे प्रयोग आणि कार्यक्रम करावे अशी संकल्पना अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनीलजी चौधरी यांच्या मनात आली आणि त्यांनी व्हॉट्स ॲप ग्रृपच्या माध्यमातून समविचारी मंडळीना एकत्र आणलं आणि अंबरनाथ मधील पत्रकार आणि अंबर भरारीचे सदस्य किरण सासे यांनी या ग्रुपचे ‘अंबर भरारी’ असे नामकरण केले.

अंबर भरारी ही संस्था सुरू करण्याचा त्यांचा उद्देश असा की, अंबरनाथ मधील कर्तृत्ववान आणि प्रतिभावंत असे लोक आणि त्याचं कार्य जगासमोर अजून चांगल्या रीतीने मांडता यावं आणि आपल्या शहरात कोण कोण आहेत याची माहिती सुद्धा शहरवासीयांना व्हावी आणि सर्वांना या गोष्टीचा अभिमान वाटून या गोष्टीतून प्रेरणा घेऊन येणारी नवीन पिढी सुद्धा हाच समृद्ध वारसा पुढे चालविण्यासाठी प्रेरित व्हावी. अशी संकल्पना सुनील चौधरी यांच्या मनात आली त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे अभिनव उपक्रम ‘अंबर भरारी’ या संस्थाकडून राबविले जाणार आहेत. त्यातील एक उपक्रम म्हणजे अंबरनाथच्या सुप्रसिद्ध व्यक्ती यांच्या मुलाखती घेऊन त्याचं कार्य आणि त्यांचा प्रवास जाणून घ्यावा आणि एक नवा आदर्श नव्या पिढीसमोर मांडणे. आपल्या शहरवासियांना आपल्या शहरारील सुप्रसिद्ध व्यक्तींना जवळून भेटता यावं आणि संवाद साधता यावा यासाठी अंबर भरारी विविध उपक्रम राबवित असते.

अभिनेते, अभिनेत्री, संगीतकार, लेखक दिग्दर्शक, नाटककार, पत्रकार, डॉक्टर, समाजसेवी संस्था, महिला मंडळ, पोलीस कर्मचारी, उद्योजक, बिल्डर, सहकारी बँक संचालक आणि असे अनेक क्षेत्रातील मान्यवर अंबर भरारी सदस्य आहेत. सुनील चौधरी, महेंद्र पाटील, डॉ.राहुल चौधरी, गिरीश त्रिवेदी, गुणवंत खिरोदिया, दत्ता घावट, किरण सासे, अमेय रानडे, जगदीश हडप, महेश सुभेदार, संगीता गुप्ते, उर्मिला खानविलकर, प्रशांत मोरे, रूपा जगताप, निखील चौधरी हे अंबर भरारीचे प्रमुख सदस्य म्हणून धुरा वाहतात.

आगामी काळात अंबरभरारी मार्फत काही कार्यक्रम होणार आहेत.

अंबरनाथ चित्रपट महोत्सव २०१६: वेळ २३ ऑक्टोबर पासून चित्रपटांचे स्क्रीनिंग झाले असून ते ५ नोव्हेंबरपर्यंत चालेल. ६ नोव्हेंबर रोजी नामांकन जाहीर केले जातील. १४ नोव्हेंबर रोजी अंबरनाथ चित्रपट महोत्सव सांगता सोहळा आणि पारितोषिक वितरण सोहळा होईल.

एकूण पारितोषिक संख्या: चित्रपट विभाग ३५ पुरस्कार,लघुपट/ माहितीपट १० पुरस्कार अशी आहे.ऑक्टोबर २०१५ ते सप्टेंबर २०१६ या कालावधीत प्रदर्शित झालेले तसेच अप्रदर्शित झालेले मराठी चित्रपट अवयवदान याबद्दल समाजात जागरूकता निर्माण व्हावी आणि देशातील अवयव दानाची टक्केवारी वाढावी म्हणून यंदा ‘अवयव दान’ याच विषयवार लघुपट स्पर्धा

अंबरनाथ चित्रपट महोत्सवाचे वैशिष्ट्ये म्हणजे हा नगरपालिका क्षेत्रात होणारा चित्रपट महोत्सव २०१५ साली अंबरनाथ चित्रपट महोत्सव २२ दिवसात पूर्ण पार पडला, कमी वेळेत झालेला हा पहिला चित्रपट महोत्सव कोणत्याही कॉर्पोरेट किवा event management company च्या मदतीशिवाय अंबर भरारी संस्थेच्या सदस्यांनी मिळून केलेला हा महोत्सव मल्टिप्लेक्स मध्ये प्रेक्षकांना पूर्णपणे मोफत चित्रपट दाखविले जाणारा महोत्सव कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही तसेच महोत्सवासाठी काम करणाऱ्या सर्व सदस्य, परीक्षकांना कोणतेही मानधन नाही. अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव संकल्पना सुनील चौधरी आणि महेंद्र पाटील यांची अंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिवल ची रूपरेषा आणि बांधणी महेंद्र पाटील यांची २०१५ च्या महोत्सवात ४० चित्रपट दाखल झाले होते.

पहिल्या चित्रपट महोत्सवाचे पुरस्काराचे मानकरी : संगीतकार श्री अशोक पत्की, सौ, आरती अंकलीकर, मोहन जोशी, मृणाल कुलकर्णी , नंदेश उमप, आलोक राजवाडे, जयंत जठार, संतोष मुळेकर, कय्युम काझी, आलोक राजवाडे, किशोर कदम, उदय सबनीस, भाऊ कदम, सोनाली कुलकर्णी, गजेंद्र अहिरे.

सिध्दी बोबडे.
९७०२५१७५०३
siddhibobade@gmail.com
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा