महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
दिव्यांग व्यक्तींसाठी शासनाचा पुढाकार - नितीन पाटील मंगळवार, ०९ मे, २०१७
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी, त्यांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र अपंग कल्याण आयुक्तालयही स्थापन केले आहे. त्याच्या माध्यमातून या योजनाची अंमलबजावली होते. दिव्यांगासाठी या योजना कशा पद्धतीने आखल्या आहेत? त्याची अंमलबजावणी कशी होते? यासंदर्भात अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांची केलेली बातचीत नेटभेटच्या माध्यमातून.

जन्मत: अपंगत्व येऊ नये म्हणून काय दक्षता घ्यावी?
अपंगत्व येऊ नये यासाठी म्हणून काही गोष्टींची खबरदारी आई-वडिलांनी घेणे गरजेचे आहे. प्रसूतीपूर्व व प्रसुतीनंतरही आहाराची आणि आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे वेळोवेळी तपासणी करणे देखील आवश्यक आहे.

अपंगत्व आलचं तर त्यासाठी काय करावे?
मुलं जन्माला आल्यानंतर मुलाच्या आई-वडिलांनी परिचारिका डॉक्टर यांनी मुलाच्या हालचालीवर प्रतिसादावर लक्ष देणे गरजेचे आहे. त्यावरून त्या मुलाला अपंगत्व आहे की नाही हे ओळखावे. अपंगत्व कोणत्या प्रकारचे आहे. उदा. मुल चालत नाही, मुल बोलत नाही, मान पकडत नाही, अशा लहान लहान हालचालींवर लक्ष ठेवणे गरजेचे असते. अपंगत्व लक्षात आल्यानंतर त्यावर योग्य त्या उपाययोजना करायला सुरूवात करणे गरजेचे आहे. मूल जन्माला आल्यानंतर ० ते ५ वयोगट अत्यंत महत्त्वाचा असतो. या वयात त्या मुलाचा विकास होत असतो त्या काळात त्या मुलावर योग्य ते उपचार होणे गरजेचे आहे. त्यावर त्वरित उपचार करावे.

दिव्यांगत्व आलेल्या मुलांसाठी शिक्षणाच्या कोणत्या तरतुदी आहेत?
राज्य दिव्यांग जन मुलांच्या समावेशीत शिक्षणाला प्राधान्य देत. ज्या मुलांना बोधात्मक, वर्तनात्मक व मेंदू विषयक अपंगत्व असेल अशांना अधिक मदतीची गरज असलेल्या मुलांना विशेष शिक्षण पुरविले जाईल. त्याचप्रमाणे सर्व शिक्षा अभियान समावेशीत शिक्षणावर भर देऊन दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शारीरिक व तसेच सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी दिव्यांग मुलांच्या पालकांसाठी विशेष जागृती मोहीम राबविली सर्व शासकीय अनुदानित आणि खाजगी शाळा त्यांच्या सर्व कार्यरत शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच दिव्यंगत्व आलेल्या मुलांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत मिळेल. जसे शैक्षणिक साहाय्य, वर्गखोलीत मदत, शाळेत सहजसाध्य सुविधा, परीक्षेत लेखनिक, परीक्षेसाठी अधिक वेळ, अभ्यासक्रमाचे अनुकूल साधने व उपकरणे. शाळा व कार्यशाळा याद्वारे विशेष शिक्षण या मुलांना दिले जाईल. विशेष शाळांना विशेषतः अंध, कर्णबधीर आणि मेंदूच्या विकासासंबंधित अपंगत्व असलेल्या मुलांना मुख्य प्रवाहातील सर्वसाधारण शाळेत समावेशित शिक्षणासाठी शाळापूर्व प्रशिक्षण दिले जाते. त्याचप्रमाणे सर्व वसतीगृहात विशेष शाळांमध्ये आणि अनुदानित विशेष शाळांमध्ये गरजू, अनाथ, पालकांकडून दुर्लक्षित, बौद्धिक अपंगत्व असलेली, स्वमग्न, बहुपंगत्व असलेली आणि अधिक मदत गरज असलेल्या सर्व दिव्यांग मुलांना प्रथम प्राधान्य दिला जाते.

दिव्यांग मुलांनी शिक्षणाबरोबर स्वावलंबी होण्यासाठी काही विशेष तरतुदी आहेत का?
मुलांना शिक्षण तर आवश्यक आहेच त्याचबरोबर त्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण मिळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी मुलांना विशेष शाळांमध्ये गायन, वाद्यवादन, नृत्य, चित्रकला, अशा कला त्यांना शिकविण्यात येतील. त्याचबरोबर कौशल्य विकास विभागातंर्गत या विद्यार्थ्यांसाठी काही विशेष तरतुदी राबविल्या जातात. ज्यामध्ये ग्रामीण भागात जिल्ह्याच्या ठिकाणी कौशल्य विकास केंद्रे असतील या केंद्रामध्ये कृषी व्यवसाय, स्थानिक व्यवसाय, यासंबंधी कौशल्यांचे प्रक्षिशण या मुलांना देऊन त्यांच्यातील सृजनशिलतेला प्रोत्साहन दिले जाईल. हे सर्व अभ्यासक्रम उद्योग प्रेरित आणि अध्यापनशास्त्र यावर आधारित असतील तसेच ते स्वयंरोजगारासही सहयोग देतील. दिव्यांगजनांना स्वयंरोजगारासाठी मदत म्हणून शासन कर्ज सुविधा व व्याजाच्या परतफेडीमध्ये अनुदान सुविधा समाविष्ट असणाऱ्या योजना व कार्यक्रम कार्यान्वित करेल.

दिव्यांगजन मुली व स्त्रियांसाठी काही विशेष तरतुदी आहेत का?
मुली महिलांचे शोषण, गैरवर्तन, कोणत्याही प्रकारच्या हिंसा याने पीडित दिव्यांग महिला व मुलींसाठी सुरक्षा, समुपदेशन आणि मदत सेवा पुरवल्या जातील. अपंगत्व असलेल्या महिलांचे त्याचे अधिकार व कर्तव्याच्या बाबतीत सबलीकरण केले जाईल. अपंगत्व असलेल्या मुलींना महिलांना त्याचे अधिकार व कर्तव्याच्या बाबतीत सबलीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सबलीकरण म्हणजे स्वतःची क्षमता ओळखणे व विकसीत करणे. शोषण, गैरवर्तन, मारहाण या बाबतीत दिव्यांग महिला मुलींच्या तक्रारीसाठी सुगम्य, सुरक्षित तक्रार यंत्रणा असेल.

सिद्धी बोबडे
आंतरवासिता, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय.
९७०२५१७५०३
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा