महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
जैवविविधता जपतांना पारंपरिक ज्ञानाची जोपासना आणि स्वामित्व हक्काचे रक्षण याला प्राधान्य - डॉ.विलास बर्डेकर गुरुवार, १२ डिसेंबर, २०१९
 

महाराष्ट्र राज्यातील जैवविविधतेचे रक्षण आणि संवर्धन व्हावे म्हणून राज्यात जैवविविधता बोर्डाची स्थापना करण्यात आली. या मंडळामार्फत या क्षेत्रातील पारंपरिक ज्ञानाचे जतन करण्याबरोबर त्यावर स्वामित्व हक्क प्रस्थापित करणे, आपल्या जैवविविधता नोंद वह्या अद्ययावत करणे, या क्षेत्रातील संशोधनाला मदत करणे असे अनेक प्रकारचे काम केले जाते. सांगताहेत जैवविविधता बोर्डाचे अध्यक्ष डॉ.विलास बर्डेकर.


 


महाराष्ट्र
राज्य जैवविविधता बोर्डाची स्थापना कधी आणि कोणत्या उद्देशाने झाली?

 

महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाची स्थापना दिनांक 02 जानेवारी 2012 ला झाली आहे. जैविक संसाधनाचे, जतन, संरक्षण, संवर्धन करणे, त्याच्या शाश्वत वापरांसंबंधी जनजागृती सनियंत्रण करणे, वाणिज्यिक वापरातून मिळणाऱ्या लाभांचे समन्यायी वाटप करणे तसेच जैविक संसाधन आधारित परंपरागत ज्ञानाची  जोपासना करणे हे या जैवविविधता मंडळाच्या स्थापनेमागचे उद्दिष्ट आहे.

 

जैवविविधतेच्यादृष्टीने महाराष्ट्र किती संपन्न आहे?

 

Ø  भारतात समृद्ध असलेल्या दोन जैवविविधता केंद्रापैकी एक महत्वाचे क्षेत्र आपल्याकडे आहे ते म्हणजे पश्चिम घाट. या भागाला  जगात Biodiversity Hotspot म्हणून घोषीत केले आहे.

Ø  यामध्ये खालील प्रमाणे जैवविविधता दिसून येते

-          आवृत्तबीज प्रजाती  - ( Angiosperm Species- 3134)

-          पश्चिम घाट  – सरपटणारे प्राणी, बिबटा, उभयचर बेडूक (आंबोली)

-          विदर्भ पट्टेरी वाघ

 

महाराष्ट्रात जंगलांचे किती प्रकार आहेत?

महाराष्ट्र हे खू मोठे राज्य असून राज्यात 61935 चौ.कि.मी. चे क्षेत्र वनाखाली आहे. एकूण भौगोलिक क्षेत्राच्या हे प्रमाण २०.१० टक्के इतके आहे. भारतातील वनक्षेत्राशी महाराष्ट्राच्या वनक्षेत्राचे प्रमाण 8% आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जंगले असणारा विभाग विदर्भ आणि सर्वात कमी जंगले असणारा विभाग मराठवाडा आहे. गडचिरोली हा सर्वाधिक जंगल असणारा जिल्हा आहे.
 

Ø  महाराष्ट्रातील वनांचे प्रकार

-          सदाहरित वने,

-          आद्र पानझडी वने,

-          शुष्क पानझडी वने, झुडपी

-           काटेरी वने असे आहेत.

 

यात किती प्रजाती धोकादायक अवस्थेत आहेत, म्हणजे प्राणी आणि वनस्पतीही, यात पक्षी येतात का?

 

महाराष्ट्रात धोकादायक स्थितीमध्ये असणाऱ्या वनस्पती प्राणी प्रजाती एकूण 167 आहेत. यामध्ये पक्षी, मासे, कीटक, फुलपाखरे यांचाही समावेश आहे. मंडळाने नुकतीच विविध विभागाशी सल्लामसलत चर्चा करुन संकटग्रस्त आणि धोकाग्रस्त प्रजातींची यादी बनवलेली आहे. त्यामध्ये पुढील प्रजाती येतात.

 

1.        वनस्पती - 149  प्रजातीमुख्यत: Ceropegia – 17 प्रजाती

2.       पक्षी - 6  प्रजाती  - मुख्यत:  Forest Owlet (पिंगळा), गिंधाड  (4 प्रजाती)

3.       सस्तन प्राणी  - 2 प्रजाती  - मुख्यत: Kondana Rat, Malabar civet

4.      सरपटणारे प्राणी  - 3 प्रजाती - मुख्यत: Leatherback Turtle

5.       मासे  - 2 प्रजाती - मुख्यत: Pondicherry Shark

6.       कोळी  - 2 प्रजाती - मुख्यत: Peacock Tarantula

7.       उभयचर प्राणी  - 3 प्रजाती - मुख्यत: Amboli Bush Frog, Tiger Toad

 

जैवविविधता वाचवायची असेल तर काय करायला हवं ?

 

जैवविविधतेचे महत्व आणि त्याच्या संबंधित परंपरागत ज्ञानाची जनसामान्यामध्ये जागृत निर्माण करणे, ह्यामध्ये स्थानिक वाण, स्थानिक प्राणी प्रजाती यांचे महत्व पटवून यायला हवे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावर स्थापन झालेल्या जैविक विविधता व्यवस्थापन समितीची भूमिका महत्वाची आहे.

जैवविविधता वाढण्याच्यादृष्टीने हे बोर्ड कसं काम करतं, फक्त प्राण्यांसाठी हे काम आहे की वनस्पतींसाठीही?

नाही. जैवविविधता मंडळ फक्त प्राणी नव्हे तर वनस्पतीसाठी सुद्धा काम करते. देवराई संवर्धन ही प्रामुख्याने वनस्पतीच्या संवर्धनाकरिता आखण्यात आलेली योजना आहे त्याचे नाव "मिशन देवराई" आहे. मंडळ जैवविविधतेच्या संवर्धनासाठी जनजागृती मोहीम, लोकजैविक विविधता नोंदवही तयार करुन घेणे विविध प्रकारचे संवर्धन प्रकल्प राबविणे यासारखे काम करते. मंडळाने  महाशीर मासा जतन आणि संवर्धन, गवळाऊ गाय, चिंकारा प्रकल्प, महाराष्ट्र जनुक कोष असे विविध प्रकल्प पूर्ण केले आहेत.  विशेष प्रकारची जैवविविधता असणाऱ्या स्थानांना जैवविविधता वारसा स्थळ घोषित करण्याचे प्रयत्नही मंडळामार्फत केले जातात. ग्लोरी ऑफ आल्लापल्ली, कास पठार, गणेश खिंड (प्रस्तावित), लांडोरखोरी वन (प्रस्तावित), कासव संवर्धन क्षेत्र (आंजर्ळे, वेळास) (प्रस्तावित) ही त्याची काही उदाहरणे सांगता येतील.

 

यात लोकसहभाग किती महत्त्वाचा आहे, तो कशाप्रकारे मिळवला जात आहे?

 

वन, वन्यजीव संवर्धनात लोकसहभाग हा अंत्यत महत्वाचा आहे. यासाठी मंडळ जनजागृती कार्यशाळा आखते, विविध मोहिमांचे आयोजन ही  प्रत्येकतालुका/ जिल्हा स्तरावर नागरी स्तरावर हे काम केले जाते.

जैवविविधता
मंडळांतर्गत कार्यरत असणाऱ्या समित्या कशाप्रकारे काम करतात?

 

स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावर जैविक विविधता व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या समित्या  विकास समिती म्हणू कार्य करतात.

 

समितीअंतर्गत खालील प्रमाणे कामे होतात.

 

1.        समितीमार्फत जैवविविधतेची जनजागृती करणे

2.       परंपरागत ज्ञानाची नोंद करणे.

3.       लोक जैविक विविधता नोंदवही तयार करणे

4.      संवर्धन प्रकल्पे राबविणे, उदा. महाशीर मासा (हिराबंबई )

5.       देवराई संवर्धन, उदा. बेहडा (कोळुंब)

6.       जैवविविधता वारसा स्थळ संवर्धन

जैवविविधतेतील नावीन्य कसं शोधलं जातं, यासंबंधीची काही संशोधन प्रक्रिया आहे का?

जैवविविधतेसंदर्भात अनेकस्तरावर संशोधन होत असतं. यामध्ये शास्त्रज्ञाकडून होणारे संशोधन, स्थानिक, जनमाणसाकडून, वन विभागाकडून, पर्यावरण तज्ज्ञ आणि अभ्यासकांकडून होणाऱ्या संशोधनाला मंडळ मदत करते. प्रत्यक्ष भेटी, मुलाखती, जैविक संसाधनाच्या बाबतीत असलेले पारंपरिक ज्ञान, काही घटना विशेष यांच्या नोंदी घेऊन या क्षेत्रातील नावीन्य शोधता येतं.

आतापर्यंत यादृष्टीने झालेलं संशोधन कशाप्रकारचं आहे?
 

Ø आंबोली घाटातील उभयचर बेडूक

Ø सह्याद्री मधील वनस्पती

Ø रत्नागिरी सिंधुदूर्ग मधील ऑल्हीव रिडले कासव  ही काही उदाहरणे यात सांगता येतील.

जैवविविधतेमध्ये नोंदवहीचं महत्व किती आहे?

अत्यं महत्त्वाचे आहे. कारण ह्या नोंदवहीद्वारेच स्थानिक लोकांना तिथल्या जैवविविधता आणि त्याच्यासंबंधित असलेल्या पारंपारिक ज्ञानावर स्वामित्व हक्क दाखवणे किंवा मिळवणे सोपे होते. या नोंदवहीतील नोंदीमुळे इतर राष्ट्रामधील नागरिकांना आपल्या जैवविविधता आणि पारंपरिक ज्ञानावर स्वामित्व हक्क  (Patent) घेण्यापासून आपण थांबवू शकतो.

 

   अलिकडेच आपण राज्यातील फुलपाखरांचे मराठी नामकरण केले. ही प्रक्रिया कशी पूर्णत्वाला गेली? 

   
आजतागायत जीवजाती यांना स्थानिक नाव आणि इंग्रजी नाव दिली गेली आहेत. पण ही बाब फुलपाखरांच्या बाबतीत दिसून आली नाही. त्यातूनच फुलपाखरांना मराठमोळी नावे देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या नामकरणाचे पुस्तक सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने छायाचित्रांसहीत वाचकांसमोर ठेवण्यात आलं आहे. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपण ब्लू मॉरमॉन हे राज्य फुलपाखरू घोषित केलं आहे. महाराष्ट्राचा जैवविविधतेचा डेटा बेस संग्रहित करण्याचं कामही आपण करत आहोत.

जैवविविधता बोर्डाने केलेल्या लक्ष्यवेधी कामगिरीची काही उदाहरणे सांगता येतील का
?

 

Ø  ब्लु मॉरमॉण याला राज्य फुलपाखराचा दर्जा देण्यात आला.

Ø  महाशीर मासा संवर्धन प्रकल्प

Ø  पृथा त्रैमासिक

Ø  RET(Rare, Endangered, Threatened) – धोकाग्रस्त प्रजाती यादी निश्चित केली.

Ø  जागतिक जैवविविधता दिन साजरा करणे व या क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्याचं काम मंडळाने सुरु केलं आहे.

 

जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी आपण लोकांना काय आवाहन कराल?

 

तुम्हाला सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीची गोष्ट माहिती आहे का? तसं आहे. जैवविविधता ही आपल्या जगण्याशी, आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक अशी गोष्ट आहे, तिला संपवाल तर तुम्ही ही संपाल, त्यामुळे आपल्या आसपासची जैवविविधता सांभाळा, तिचे जतन आणि संवर्धन करा.

 

शब्दांकन : डॉ. सुरेखा मधुकर मुळे,

वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती)

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा