महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
अंध कलाकारांना व्यासपीठ, कैद्याचं प्रबोधन, मनोरंजन ! शनिवार, १५ एप्रिल, २०१७
एकीकडे अंध कलाकारांना व्यासपीठ मिळत नाही आणि दुसरीकडे तुरुंगातील कैद्यांच्या प्रबोधनासाठी, मनोरंजनासाठी एक संधी उपलब्ध व्हावी अशा दुहेरी हेतूने श्रीमती ‘नयना कट्ट्पन’ यांनी 'नयन फाउंडेशन ' च्या वतीने अंधांचा ऑर्केस्टॉ, सुरू केला. या अभिनव उपक्रमाविषयी त्यांच्याशी झालेली ही बातचीत.

तुम्ही या क्षेत्राकडे कशा वळल्या? तुम्हे जे काम करत आहात, ते कौतुकास्पद आहे हे काम तुम्ही पूर्ण वेळ करता का?
१९८५ च्या दरम्यान मी आंध्र बँकेत नोकरीला होती. मदर तेरेसा या माझ्यासाठी आदर्श आहेत. त्याचं काम मला कायमचं प्रेरणादायी वाटतं. २५ वर्षे नोकरी केल्यानंतर वयाच्या ४७ व्या वर्षी नोकरी राजीनामा दिला. सेवानिवृत्ती वेतन असताना देखील त्यांनी तो पर्याय स्वीकारला नाही. एकदिवसीय पर्सनालिटी डेव्हलपमेंटची कार्यशाळा सुरू होती. त्यातील पहिला भाग चालू असताना माझ्या लक्षात आले की, ह्या अंध लोकांमध्ये बऱ्याच कला आहेत. त्यातील काही मुलामुलींना गाता येतं तर काहींना नृत्यकला अवगत आहे, मिमीक्री, वाद्य वाजवता येत होते अशा सर्वांमधून मधून ‘नयन फाउंडेशन’ या संस्थेचा जन्म झाला.

ह्या संस्थेचा मूळ उद्देश काय आणि त्याचे काम कसे चालते?
‘नयन’ यासंस्थेचे दोन मूळ उद्देश आहेत.. अंध मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसचं कारागृहातील कैद्यानंचे प्रबोधन, मनोरंजन, व्हावं. त्यांना त्यातून प्रेरणा मिळावी.

आतापर्यंत आपल्याला काम करताना आलेले काही स्मरणीय क्षण कोणते?
देवनार सुधारगृहातील कार्यक्रमानंतर तिथल्या कैद्यांनी माझे आभार व्यक्त केले... ते म्हणाले, तुम्ही ह्या अंध व्यक्तींना इथे आणले...त्यामुळे आमच्या जगण्याची नवी उमेद मिळाली. आता आम्हाला सुद्धा जीवनातील निराशेवर मात करण्याची प्रेरणा मिळाली. हे ऐकल्यावर मला आनंद झाला. मला माझा उद्देश पूर्ण झाल्या सारखे वाटलं.

काम करताना काही वेगळा अनुभव आला का?
काम करताना आतापर्यंत आलेले सगळेच अनुभव हे वैशिष्ट्यपूर्ण होते. प्रत्येक व्यक्तींमध्ये काही ना काही विशिष्ट कला गुण आहेत. ह्या अंध मुला मुलींना घेऊन ऑर्केस्टा करण्याचा हेतू हा की, त्यांच्या सादरीकरणातून कैद्यांना जीवनातील कोणत्याही संकटावर मात करू शकता हे दाखवायचं होतं.

आता पर्यंत कुठे कुठे कार्यक्रम झाले आहेत?
आतापर्यंत देवनार सुधारगृह, आर्थर रोड कारागृह, भायखळा कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, बालसुधारगृह, डोंगरी कारागृह, येरवडा कारागृह, पुणे, आणि तिहार कारागृह नवी दिल्ली येथे कार्यक्रम झाले. भायखळ्यात तर आजपर्यंत ३ वेळा कार्यक्रम झाले. महिला दिनाचे औचित्य साधून देखील नुकताच कार्यक्रम करण्यात आला..

या पुढील आपले उपक्रम, संकल्प काय आहेत?
मी पुणे, दिल्ली, अहमदाबाद अशा शहरांमध्ये निवडप्रकियेद्वारे काही नवीन लोकांना ह्या कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेणार आहे. त्यांच्या मधील कलागुणांसाठी व्यासपीठ देणार आहे. कार्यक्रमाचं स्वरूप हे नृत्य, वादन, कला, मिमीक्री नाट्य, संगीताची वाद्य वाजवणे असे असेल. त्याचप्रमाणे सामाजिक भान जपणारे कार्यक्रम केले जातील.

सिध्दी बोबडे
९७०२५१७५०३
आंतरवासिता माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा