महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
एकनाथ शिंदे यांच्याकडून समृद्धी महामार्गाची पाहणी शनिवार, ०१ जून, २०१९


नाशिक
: सिन्नर तालुक्यातील पॅकेज क्रमांक 12 च्या माती बांधकाम दबाईची पाहणी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
 

या समृद्धी महामार्गादरम्यान नाशिक जिल्ह्याचाही समावेश आहे. नाशिक जिल्ह्यामधून 101 किलोमीटर लांबीचा महामार्ग सिन्नर व  इगतुपरी या तालुक्यातून जाणार आहे. सिन्नर तालुक्यातील 26 व इगतपुरी तालुक्यातील 23 अशा 49 गावांचा या महामार्गात समावेश आहे. या महामार्गाचे काम एकूण 16 पॅकेजेसमध्ये करण्यात येणार आहे.

Share बातमी छापा