महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ पूर्वतयारीचा निवडणूक निरिक्षक डॉ. जे. रवीशंकर यांनी घेतला आढावा सोमवार, १५ एप्रिल, २०१९

हिंगोली : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवार दिनांक 18 एप्रिल रोजी होणार आहे. या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत निवडणूक निरिक्षक डॉ. जे. रवीशंकर यांनी लोकसभा मतदार संघनिहाय मतदान प्रक्रिया व पूर्व तयारीचा यावेळी  आढावा घेतला.

यावेळी डॉ. रवीशंकर म्हणाले कीयेणारे 72 तास अतिमहत्वाचे असून निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी त्यांना सोपविण्यात आलेली जबाबदारी योग्य रितीने पार पाडावी. तसेच लोकसभा निवडणुका पारदर्शकपणेनिर्भिड वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करावेअसे निर्देश दिले.

यावेळी बैठकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रूचेश जयवंशीपोलीस अधीक्षक योगेशकुमारखर्च निवडणूक निरिक्षक एस.एम. सुरेंद्रनाथअपर जिल्हाधिकारी जगदिश मिणियारअपर पोलीस अधीक्षक यशवंत काळेनिवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशीउप जिल्हा निवडणूक अधिकारी भाऊसाहेब जाधवसहायक निवडणूक निरिक्षक अतुल चोरमारेप्रशांत खेडकरप्रविण फुलारी यांच्यासह सर्व नोडल अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांची उपस्थिती होती.

Share बातमी छापा