महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
आपल्या परिसरातील प्रत्येक मतदाराचे मतदान होईल यासाठी परिश्रम घ्या - जिल्हाधिकारी जी. श्रीकांत सोमवार, १५ एप्रिल, २०१९


लातूर : करीयर घडविण्याकरीता जसे परिश्रम तुम्ही विद्यार्थी घेत आहात, त्याचप्रमाणे लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्या परिसरातील प्रत्येक मतदाराचे मतदान होईल यासाठीही सर्वांनी परिश्रम घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी संत तुकाराम मॉडेल इंग्लिश स्कूल येथे आयोजित चुनावी पाठशाला कार्यक्रमात केले.

लातूर लोकसभेसाठी १८ एप्रिल रोजी रोजी मतदान असून त्यासाठी मतदान जनजागृती होण्याकरीता संत तुकाराम मॉडेल इंग्लिश स्कुल चुनावी पाठशाला कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा, पोस्टर प्रेझेन्टेशन, घोषवाक्य स्पर्धा, सेल्फी कॉर्नर, वॉल पेटींग, मतदार जागृतीपर विविध स्टँडी आदींसह मतदान यंत्राचे प्रात्यक्षिकासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या विविध उपक्रमात सहभाग नोंदवला.

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मतदान यंत्रविषयक माहिती व प्रशिक्षण दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदान जागृतीपर नाटिका सादर केली. यावेळी कार्यक्रमात गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, प्राचार्य मैदर्गे यांची उपस्थिती होती.
Share बातमी छापा