महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जिल्‍हयातील जनावरांच्‍या छावण्‍यासाठी सभाव्‍य खर्चाकरिता 100 कोटीचा निधी उपलब्‍ध करुन दिला जाईल - उपमुख्‍यमंत्री रविवार, १२ मे, २०१३
अहमदनगर - दुष्‍काळी परिस्थितीत शेतक-यांचे पशुधन जगविणे आवश्‍यक आहे. जिल्‍हयातील  जनावरांच्‍या छावण्‍यासाठी आगामी काळात संभाव्‍य खर्चा करिता  लागणारा 100 कोटीचा निधी उपलब्‍ध करुन दिला जाईल अशी माहिती राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी दिली.

 अहमदनगर जिल्‍हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्‍हयातील टंचाई परिस्थितीबाबत आढावा बैठक उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झाली. त्‍यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्‍याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्‍हयाचे पालकमंत्री बबनराव पाचपुते, जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष विठ्ठलराव लंघे, उपाध्‍यक्षा मोनिकाताई राजळे, जिल्‍हाधिकारी डॉ. संजीव कुमार, जिल्‍हा परिषदचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल आदि  वरिष्‍ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी  उपस्थित होते.

 

दुष्‍काळी परिस्थितीत जनतेच्‍या मागणीनुसार पिण्‍याचे पाणी, हाताला काम आणि जनावरांसाठी चारा, छावण्‍या उपलब्‍ध करुन देण्‍यास शासन कटिबध्‍द आहे. यासाठी शासन पुरेसा निधीही  उपलब्‍ध  करुन देत आहे.  जिल्‍हयातील छावण्‍यासाठी  जून 2013 पर्यन्‍त  संभाव्‍य  खर्च 100 कोटीचा आहे. हा निधी  दिला जाईल असे सांगून उपमुख्‍यमंत्री अजित पवार  म्‍हणाले सातत्‍याने निर्माण  होणा-या  पाणी टंचाईवर मात करण्‍यासाठी कायमस्‍वरुपी  योजना  राबविणे आवश्‍यक आहे. सिमेंट बंधा-यांचे कामे दर्जेदार करावीत अशी सूचना करुन  राज्‍यातील प्रत्‍येक जिल्‍हयाची भौगोलीक परिस्थिती वेगवेगळी आहे.  त्‍यामुळे शिरपूर पॅटर्न राबविण्‍यासाठी लागणारे निकष ठरविण्‍याकरिता स्‍थापन केलेल्‍या समितीचा अहवाल प्राप्‍त  झाल्‍यानंतर  यासंबधी  निर्णय घेतला जाईल कोल्‍हापूर पध्‍दतीच्‍या बंधा-याच्‍या  दरवाजे  दुरुस्‍तीसाठी  धोरणात्‍मक निर्णय घ्‍यावा लागेल असे सांगितले.

 

जिल्‍हयातील पाझर तलावांची  दुरुस्‍ती  व गाळ काढण्‍याच्‍या कामासाठी  व जिल्‍हयातील पाझर तालावाचे घळभरणी  कामासाठी  निधीची तरतूद केली जाईल. लोकसहभागातून तलावातील गाळ काढण्‍याचा कार्यक्रम मोठया प्रमाणावर  राबविण्‍यात यावा.  केंद्र व राज्‍य शासनाच्‍या  मदतीने दुष्‍काळ निवारणार्थ मोठी मदत दिली जात आहे. दुष्‍काळग्रस्‍तांना दिलासा देण्‍याचे कामी सर्वानी अधिक सहकार्य करावे असे सांगून छावणीत दाखल असणारे जनावरे आजारामुळे छावणी बाहेर नेले तरी त्‍यांना चारा व पाण्‍यासाठी अनुदान दिले पाहिजे अशा सूचना ही त्‍यांनी यावेळी दिल्‍या.                              

दुष्‍काळी परिस्थितीत पिण्‍याचे पाणी, जनावरांसाठी चारा पाणी,  मागेल त्‍याला काम देण्‍यासाठी जिल्‍हयात नियोजन करुन प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे, त्‍यामुळे दुष्‍काळग्रस्‍तांना मोठा दिलासा मिळालेला आहे. जनावरांच्‍या छावण्‍यामध्‍ये शासनाच्‍यावतीने देण्‍यात येणा-या पशुखाद्या व्‍यतिरिक्‍त चार किलो मोफत अतिरिक्‍त पशुखाद्य दिले जात आहे.  पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी कुकडी धरणातून पाणी सोडण्‍याचा निर्णय झालेला आहे. मनरेगाच्‍या कामात येणा-या अडचणी ही वेळोवेळी बैठका घेऊन मार्गी लावल्‍या आहेत. पिण्‍याच्‍या पाणी पुरवठा  केला जात असलेल्‍या गावात पाणी  साठविण्‍यासाठी पाण्‍याच्‍या टाक्‍याचे वितरीत  केले आहे. क वर्ग नगर पालिका क्षेत्रात जनावरांच्‍या छावण्‍या सुरु करण्‍यासह मान्‍यता  दिली आहे. जनावरांच्‍या अनुदानातही वाढ करण्‍यात आली आहे अशा वि‍विध उपाय योजनामुळे दुष्‍काळग्रस्‍तांना दिलासा देण्‍याचे काम शासन व जिल्‍हा प्रशासन प्रभावीपणे करीत आहे असे पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी सांगितले.

यावेळी आमदार सवेश्री विजय औटी, चंद्रशेखर घुले, भाऊसाहेब कांबळे, शंकरराव गडाख, शिवाजी कर्डिले, अशोक काळे आदिनी विधायक सूचना केल्‍या.

 

प्रारंभी जिल्‍हाधिकारी डॉ. संजीव कुमार यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून प्रास्‍ताविक केले.

या बैठकीस आमदार अरुण जगताप, माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, जि.प. कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बाबासाहेब तांबे, निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. सदानंद जाधव, जि. प. चे अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र पाटील, रोहयोचे उपजिल्‍हाधिकारी राहुल पाटील आदी अधिकारी जिल्‍हयातील उपविभागीय अधिकारी ,तहसीलदार ,गट विकास अधिकारी विविध शासकीय यंत्रणेचे वरिष्‍ठ अधिकारी ,जि.प चे पदाधिकारी , सदस्‍य  उपस्थित होते.

                                                

Share बातमी छापा