महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
निवडणूक निरीक्षक पालघरमध्ये दाखल बुधवार, १० एप्रिल, २०१९

पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघासाठी सामान्य निवडणूक निरीक्षक म्हणून रविंद्रा पी.एन. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते पालघरमध्ये दाखल झाले असून निवडणूक यंत्रणेच्या तयारीचा प्राथमिक आढावा त्यांनी घेतला.

निवडणूक निरीक्षक रविंद्रा पी.एन. (भा.प्र.से.) हे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे सोयीनुसार सकाळी 11 ते 12 या वेळेत नागरीकांना भेटण्यासाठी उपलब्ध असतील. त्यांचा मोबाईल क्रमांक 7507705604 असा आहे. निरीक्षकांशी ravindrakas.rp@gmail.com या ईमेलच्या माध्यमातून देखील संपर्क साधता येईल.

निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून डॉ. भागिरथी गवारकर यांची नियुक्ती झाली असून त्यांचा संपर्क क्रमांक 7507706507 असा आहे. पोलीस निवडणूक निरीक्षक म्हणून आनंदकुमार (भा.पो.से.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 7507705220 असा आहे.

Share बातमी छापा