महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
निवडणूक निरीक्षक दाखल सोमवार, ०८ एप्रिल, २०१९
 ठाणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निरीक्षक श्रीमती क्रीशनानी दाखल

ठाणे :
जिल्ह्यातील २५ ठाणे लोकसभा मतदार संघाचे निवडणूकीकरीता सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक श्रीमती शेली क्र्रीशनानी (भा.प्र.से) ह्या मतदार संघात दाखल झाल्या आहेत. त्यांचा संपर्क क्रमाक ९३७२५७०४२१ हा आहे. त्या शासकीय विश्रामगृह कोर्ट नाका ठाणे येथे सकाळी ११ ते १२ या वेळेत उपलब्ध असतील, अशी माहिती ठाणे लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक यांनी दिली आहे.

कल्याण लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक मोहम्मद तय्यब दाखल
जिल्ह्यातील २४ कल्याण लोकसभा मतदार संघाचे निवडणूकीकरीता सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक मोहम्मद तय्यब (भा.प्र.से) हे या मतदार संघात दाखल झाले आहेत. त्यांचा संपर्क क्रमाक ०२५१-२५६७४५१व मोबाईल क्र. ९३७२५७१४२३ हा आहे.ज्या व्यक्तींना लोकसभा निवडणूकी संदर्भात काही मुद्दे माडांयचे असतील तर त्यांच्यासाठी ते निवडणूक निरीक्षक यांचे कार्यालय,मंगल विहार बगलो,सेच्युरी रेयॉन कंपनी ,कल्याण –मुरबाड रोड ,उल्हासनगर -१ ता. उल्हासनगर, जि.ठाणे,या ठिकाणी मंगळवार दि.९ ते सोमवार दि.२९ या कालावधीत सकाळी साडेनऊ ते साडेदहा या वेळेत उपलब्ध असतील.

भिवंडी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक रमेश बिधान दाखल
जिल्ह्यातील २३ - भिवंडी या मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक रमेश चंदर बिधान (भा.प्र.से) हे भिवंडी मतदार संघात दाखल झाले आहेत. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९३७२५७७२८० असा आहे. ते महापारेषण विश्रामगृह पडघा येथे सकाळी ११ ते १२ या वेळात नागरिकांना भेटण्यासाठी उपलब्ध असतील,असे निवडणूक निर्णय अधिकारी भिवंडी यांनी कळविले आहे.
Share बातमी छापा