महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
निवडणूक निरीक्षक खर्च मंजुनाथ यांची माध्यम संनियंत्रण व प्रमाणीकरण समितीस भेट रविवार, १४ एप्रिल, २०१९


रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी येथे सुरु करण्यात आलेल्या माध्यम कक्ष तसेच माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण कक्षाचे काम चांगले आहे, असे उद्गार निवडणूक निरीक्षक (खर्च) मंजुनाथ तागडी यांनी आज या कक्षाला दिलेल्या भेटीदरम्यान काढले.

निवडणूक निरीक्षक मंजुनाथ यांनी आज सकाळी पावस यथे स्थिर सर्व्हेक्षण पथकाच्या पाहणी दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर दुपारी त्यांनी जिल्हा माहिती कार्यालयास भेट दिली. जि.प. चे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी मानसिंग पाटील हे त्यांच्यासमवेत होते.

जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी लोकराज्यचा निवडणूक विशेषांक देवून त्यांचे स्वागत केले. कार्यालयात माध्यम संनियत्रण व प्रमाणीकरण समितीसह माहिती कक्षाचेही काम चालते. या कामाची त्यांनी माहिती जाणून घेतली. या ठिकाणी होणाऱ्या दैंनदिन प्रेस ब्रिफींग व इतर कामकाजाचा आढावा त्यांना सादर करण्यात आला.

उमेदवाराच्या जाहिराती तसेच इतर सोशल मिडियावर होणाऱ्या प्रचारावर लक्ष ठेवण्याचे काम कशा पध्दतीने चालते याचीही माहिती त्यांनी यावेळी घेतली. याबाबत असणारे विहित नमुने बघून त्यापैकी एक नमुना त्यांनी यावेळी तपासला. सोबतचे प्रमाणीकरण झालेल्या जाहिरातींची माहिती त्यांनी घेतली. माहिती व जनंसपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या लोकराज्यच्या गुजराथी आणि हिंदी अंकाची पहाणी त्यांनी केली. महाराष्ट्र अहेडबाबतही त्यांनी यावेळी माहिती घेतली.

माध्यम कक्षातील टी.व्ही. यंत्रणा व त्यावर लक्ष ठेवण्याचे काम कशा पध्दतीने चालते हे त्यांनी जाणून घेतले. कार्यालयात येणारी वृत्तपत्रे आणि त्यातून कात्रणे जमा करण्याचे काम कशा पध्दतीने होते याचीही माहिती त्यांनी घेतली. या भेटीप्रसंगी योगेश मोडसिंग, शशिकांत केळकर, रुपेश कांबळे, माधवी शिंदे, अजित पडयाळ, दीपक महाडिक आदिंची उपस्थिती होती.
Share बातमी छापा