महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात प्रशिक्षण सत्र शनिवार, १३ एप्रिल, २०१९


रत्नागिरी : लोकसभा मतदारसंघात नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्या प्रशिक्षणाचे दुसरे सत्र पार पडले. रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह येथे झालेल्या प्रशिक्षणात निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी प्रशिक्षण दिले.


हे प्रशिक्षण रत्नागिरी विधानसभा संघ क्षेत्रासाठी झाले. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे, रत्नागिरी तहसिलदार शशिकांत जाधव तसेच क्षेत्रीय अधिकारी आदींनी यात सहभाग घेतला.

निवडणूक कर्मचाऱ्यांनी निवडणुकीचे काम सकारात्मकतेने आणि संघभावनेने करावे. केंद्राध्यक्ष हा केंद्राचा प्रमुख असतो. त्याच्या मार्गदर्शनाखाली केंद्रावरील सर्वांनी निवडणुकीचे काम करणे गरजेचे आहे असे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले. व्हिव्हिपॅट मशीन आणि त्याची कार्यपध्दती इव्हीएम मशीन व त्या अनुषंगाने मतदान केंद्रात करावयाच्या उपाययोजना आदींबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलेकर्मचारी आणि अधिकारी यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवला तर मतदानाचे प्रमाण वाढीसाठी मतदार संघात घेतले जाणारे प्रयत्न सफल होतील आणि प्रमाण वाढेल असेही सुनील चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

मतदारसंघात निवडणुकीसाठी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण दुसऱ्या टप्प्यात अंतर्गत आज जिल्ह्यात विधानसभा मुख्यालयांच्या ठिकाणी झाले या प्रशिक्षणात पहिल्या प्रशिक्षणात झालेल्या कामांची उजळणी करण्यात आली त्यासोबतच मतदान केंद्रावर घ्यायची खबरदारी आणि आयोगाच्या विविध सूचना बाबत सविस्तर माहिती देण्यात आली. टेंडर वोट चॅलेंज वोट तसेच मतदान केंद्रात दिव्यांगांसाठी करावयाच्या विशिष्ट सुविधा उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातून घ्यायची खबरदारी या सर्व बाबतीत या प्रशिक्षणात कर्मचाऱ्यांना अवगत करण्यात आले.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार यंदा मतदान केंद्रात मोबाईल दूरध्वनी नेण्यास बंदी आहे. त्यासोबतच प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांच्या मदतीसाठी एक स्वयंसेवक राहणार आहे. ज्येष्ठ आणि दिव्यांगांना मतदान करणे शक्य व्हावे यासाठी त्यांना व्हीलचेअर द्वारे मतदान केंद्रापर्यंत आणणे आणि परत घरापर्यंत पोहोचवणे याचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मायक्रो ऑब्झर्वर अर्थात सूक्ष्म निरीक्षक यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत त्यांचे प्रशिक्षण सोमवार दिनांक 15 एप्रिल रोजी होणार आहे हे निरीक्षक देखील या मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून असतील. याच प्रकारचे प्रशिक्षण चिपळूण, दापोली, गुहागर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी येथे पार पडले.
Share बातमी छापा