महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
एमसीएमसीच्‍या कामकाजाची निवडणूक खर्च निरीक्षक श्रीवास्‍तव यांच्‍याकडून पहाणी सोमवार, १५ एप्रिल, २०१९


पुणे : शिरुर लोकसभा निवडणुकीसाठी नेमण्‍यात आलेले केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक रंजन श्रीवास्‍तव यांनी जिल्‍हास्‍तरीय माध्‍यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीला (मीडिया सर्टीफीकेशन ॲण्‍ड मॉनिटरींग कमिटी- एमसीएमसी) भेट देऊन पहाणी केली. एमसीएमसीकडून दृक-श्राव्‍य जाहिराती प्रमाणित करुन देण्‍यात येतात.

यावेळी उपस्थित सदस्‍यांशी त्‍यांनी चर्चा केली. समन्‍वय अधिकारी नंदिनी आवडे, उपजिल्‍हाधिकारी सुधीर जोशी, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी जगदीश राव, दूरदर्शनचे कार्यक्रम प्रमुख संजय कर्णिक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा. योगेश बोराटे, टी.पी.शर्मा, एस.बी.निकम, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, पुणे मनपाचे जनसंपर्क अधिकारी संजय मोरे, पोलीस उपनिरीक्षक शामल दीपक पाटील आदी उपस्थित होते.
Share बातमी छापा