महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
रोह्यातील अंजुमान माध्यमिक विद्यालयात उर्दू लोकराज्य मेळावा शनिवार, २९ जुलै, २०१७
नवी मुंबई : कोकण विभागीयस्तरावरील उर्दू लोकराज्य मेळावा दि. 01 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 10.30 वाजता अंजुमान माध्यमिक उर्दू विद्यालय रोहा, जि.रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) डॉ. गणेश व. मुळे, हे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून प्राचार्य वसीम मुलहक सातारेकर असणार आहेत. तर कोंकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष श्री. मिलींद अष्टिवकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा माहिती अधिकारी, रायगड मिलींद दुसाने यांनी केले आहे.

जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे अनिरुद्ध अष्टपुत्रे, जिल्हा माहिती अधिकारी रत्नागिरी मिलिंद बांदिवडेकर, जिल्हा माहिती अधिकारी पालघर दत्तात्रय कोकरे हे या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यास उर्दू भाषीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय रायगड यांनी केले आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result