महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
गंगापूरला शोध व बचाव पथकाने वाचवले ८० लोकांचे प्राण शनिवार, ०७ सप्टेंबर, २०१९


जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर परिस्थितीचा आढावा

चंद्रपूर :
पोंभुर्णा तालुक्यात गंगापूर( टोक) गावात वैनगंगा नदीच्या पुराचे पाणी गावात शिरले असता तिथल्या लोकांना काढण्याचे काम चंद्रपूर पोलीस शोध व बचाव पथकाने केले. परिश्रमाने ८० लोकांना सुखरूप बाहेर काढले. पावसाचा जोर वाढत असल्याने निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचा अधिकाऱ्यांसमवेत आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी आज आपत्ती निवारण कक्षात घेतला.

या पथकामध्ये पोलीस अशोक गरगेलवार( बोट चालक), समीर चापले, दिलीप चव्हाण, उमेश बनकर , वामन नाक्षीने, गिरीश मरापे , मेकशाम गायकवाड, विकी खांडेकर , मंगेश मत्ते यांनी पाण्यात अडकलेलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढले. या संपूर्ण परिस्थितीवर जिल्हाधिकार्यालयाचे नियंत्रण असून जिल्हाधिकाऱ्यांनी आज अधिकाऱ्यांसोबत पूर परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असून पुन्हा पूर परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे आपत्ती निवारण यंत्रणेला सतर्क राहणे गरजेचे आहे. जिथे नागरिकांना आवश्यकता आहे तिथे मदत पोहोचणे प्रशासनाचे प्राथमिक कर्तव्य असून उपविभागीय तसेच तालुकास्तरीय आपत्ती निवारण कक्षाने सतर्क राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी यंत्रणेला दिले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result