महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
उद्योगांचे पुनरुज्जीवन व पुनर्विकास करणार - अरविंद सावंत मंगळवार, ०४ जून, २०१९


अरविंद सावंत यांनी स्वीकारला केंद्रीय अवजड उद्योग मंत्रिपदाचा पदभार

नवी दिल्ली :
अरविंद सावंत यांनी आज केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. देशातील उद्योग पुनरुज्जीवित व पुनर्विकसित करून बेरोजगारीची समस्या दूर करण्यास प्राथमिकता असेल असा विश्वास श्री सावंत यांनी व्यक्त केला.

उद्योग भवनात आज श्री. सावंत यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केंद्रीय अवजड उद्योग विभागाचा पदभार स्वीकारला. विभागाचे सचिव अशाराम सिहाग यांच्यासह उपस्थित अन्य अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. सावंत यांचे स्वागत केले. श्री सावंत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, देशातील उद्योग क्षेत्रात सुधारणांची गरज आहे. या खात्याचा मंत्री म्हणून नवीन संकल्प घेऊन उद्योगांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल. देशात शेती व बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी उद्योग विभाग महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो. यासाठी उद्योगांचे पुनरुज्जीवन करणे, त्यांचा पुनर्विकास करण्यास आपले प्राधान्य राहील असे श्री. सावंत म्हणाले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result