महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
क्रांतिसूर्याला अभिवादन करणारा लोकराज्यचा अंक संग्राह्य - पालकमंत्री सुभाष देशमुख शुक्रवार, १४ एप्रिल, २०१७
सांगली : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही मार्गदर्शक असून, त्यातून त्यांचे द्रष्टेपण दिसून येते. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनाच्या लोकराज्य या मासिकाचा एप्रिल महिन्याचा क्रांतिसूर्य अंकातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. क्रांतिसूर्याला अभिवादन करणारा लोकराज्यचा अंक संग्राह्य आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे केले.

पालकमंत्री सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, 14 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीचे निमित्त साधून जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजयकाका पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना लोकराज्य मासिकाचा अंक भेट दिला. या अंकाचे अवलोकन केल्यानंतर पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर आधारित विशेषांक मराठी, हिंदी, उर्दु, गुजराती आणि महाराष्ट्र अहेड (इंग्रजी) अशा 5 भाषांमधून प्रकाशित करण्यात आला आहे. लोकराज्यच्या या अंकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर कार्यावर आधारित सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, शेतकऱ्यांचा हितकर्ता, स्रीमुक्तीचा उद्गाता, स्वयंप्रकाशित होण्याची प्रेरणा, बाबासाहेबांची प्रेरक पत्रकारिता, पंचतीर्थे अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result