महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जिल्हाधिकाऱ्यांनी केले ज्येष्ठांचे स्वागत मंगळवार, २३ एप्रिल, २०१९


रायगड :
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज सेंट मेरी येथे दिव्यांग संचालित मतदान केंद्राला भेट दिली. यावेळी खर्च निरीक्षक निलंक कुमार त्यांच्या समवेत होते. त्यांनी कन्या प्रशालेत आशा जोग, यशवंत पाटील, अरविंद साळवी, गजानन साळवी या ज्येष्ठ मतदारांना गुलाबपुष्पे देऊन त्यांचे स्वागतही केले. तत्पूर्वी आज सकाळी रामनाथ येथे अलिबाग नगर पालिकेच्या प्राथमिक मराठी शाळेत त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यानंतर त्यांनी तेथील ज्येष्ठ मतदारांची देखील त्यांनी विचारपूस केली.सखी मतदान केंद्रे आकर्षक
सरखेल कान्होजी आंग्रे येथील महिलांच्या सखी मतदान केंद्राला जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन महिला अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक आणि अभिनंदन केले. पेण नगरपालिका, अलिबाग येथील सरखेल कान्होजी आंग्रे नगर - १ आणि सरखेल कान्होजी आंग्रे नगर - २, श्रीवर्धनमधील उतेखोल - ४, महाड येथील कांबळे तर्फे महाड, कॅम्प दापोली, आणि गुहागर येथील गुहागर या केंद्रांवरही महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांत उत्साह दिसत होता.

शंभरीपार वयोवृद्ध गंगुबाई चव्हाण यांनी बजावला मतदानाचा हक्क
१ जानेवारी १९०८ रोजी गंगुबाई चव्हाण यांचा जन्म झाला. त्यानंतर त्यांनी १८ वर्ष पूर्ण केल्यानंतर झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मतदान केले. १९५२ रोजी झालेल्या निवडणुकीत आपण मतदान केल्याचे त्यांना आठवते. परंतु त्यावेळेच्या इतर आठवणी आठवत नाहीत.

रायगड - महाड तालुक्यातील आमशेत या गावातील ११० वर्षे वयाच्या गंगुबाई विठ्ठल चव्हाण यांनी १७ व्या लोकसभा निवडणुकीत आज आपला मतदानाचा हक्क बाजावला. १९५२ साली झालेल्या पहिल्या लोकसभेतही त्यांनी मतदाने केले होते. पहिल्या निवडणुकीच्या साक्षीदार असणाऱ्या निवडक मतदारांपैकी त्या आहेत. आतापर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीत त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. ११० वर्षांच्या आजींना मतदान केंद्रापर्यंत गाडीने आणण्यात आले.

१ जानेवारी १९०८ रोजी गंगुबाई चव्हाण यांचा जन्म झाला. त्यानंतर त्यांनी १८ वर्ष पूर्ण केल्यानंतर झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मतदान केले. १९५२ रोजी झालेल्या निवडणुकीत आपण मतदान केल्याचे त्यांना आठवते.

गंगुबाई चव्हाण यांना मतदान केंद्रापर्यत वाहनाने आणण्यात आले त्यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी त्यांचे स्वागत केले. वयोमानानुसार त्यांना चालण्याची शक्ती नसल्यामुळे नातवाने उचलून मतदान केंद्रात नेले. त्यानंतर त्यांनी आपले बहुमूल्य मत टाकले. मतदान करण्यास टाळाटाळ करणाऱ्या मतदारांसाठी या आजींनी आदर्श घालून दिला आहे.

१०८ वर्षांच्या सुलोचनाबाई ज्येष्ठ मतदार
महाड विधानसभा मतदार संघातील कांबळे तर्फे गावांतील १०८ वर्षांच्या ज्येष्ठ मतदार सुलोचनाबाई गोविंद देशमुख यांनी देशमुख कांबळे मतदान केंद्रावर मतदानाचा आपला हक्क आवर्जून बजावल्यावर महाड विधानसभा मतदार संघाचे सहा.निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल ईनामदार यांनी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने त्यांचा गौरव केला.

सुलोचनाबाई व त्यांच्या कुटूंबातील मतदार सदस्यांना मतदान केंद्रावर आणुन परत घरी सोडण्याकरिता रायगड निवडणूक यंत्रणेकडून विशेष वाहन व्यवस्था केली होती.


नववधू देखील मतदानाच्या रांगेत
मतदानाचा टक्का वाढावा म्हणून जिल्हा प्रशासनाने बरेच प्रयत्न केले आहेत त्यमुळे मतदारांमध्ये देखील जागृती निर्माण झाली आहे. अलिबाग येथील १६५ बेलकडे मतदान केंद्रावर लग्नाच्या बोहल्यावर चढण्यासाठी उत्सुक नववधू उत्कर्षा ही देखील रांगेत उभी होती. याच सुमारास खर्च निरीक्षक निलांक कुमार हे भेटीसाठी आलें असतांना त्यांना कौतुक वाटले आणि त्यांनी तिला शाबासकी दिली. जिल्हा प्रशासनाचे मतदान वाढावे प्रशासनाचे मोलाचे योगदान दिसत आहेत असेही ते म्हणाले.

२६३ दापोली विधानसभा मतदारसंघातील जळगाव येथील सुप्रिया संजय गुरव या नववधूने देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला. खेड येथे देखील एक नववधू मतदानासाठी रांगेत उभी होती.

रोह्यात पोलिंग एजंटवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
रोहा शहरातील मतदान केंद्र क्रमांक १४ वर पोलिंग एजंट हा मतदारांना शाई लावत असल्याबाबत तक्रार करण्यात आली होती. यावर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तातडीने या केंद्रावरील सर्व कर्मचारी बदलण्याचे तसेच पोलिंग एजंटवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्यावर देखील हलगर्जीपणा दाखविल्याबद्धल सक्त कारवाई प्रस्तावित केली आहे.

रेवसगाव येथे मतदान केंद्राबाहेरील बुथवर पक्षाचे झेंडे आणि उमेदवाराचे छायाचित्र असल्याने संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result