महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज : सर्वांनी मतदान करावे - जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे रविवार, २८ एप्रिल, २०१९
पालघर लोकसभा मतदारसंघात १२ उमेदवार

पालघर :
लोकसभेच्या २२ - पालघर (अज) मतदारसंघात १२ उमेदवार निवडणूक लढवित असून उद्या दि. २९ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी दिली. सर्वांनी मतदानाचा अधिकार बजावावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका
मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. निवडणूक यंत्रणेमार्फत प्रत्येक मतदाराची मतदार चिठ्ठी (Voter Slip) घरपोच पोहोचविण्याची व्यवस्था केली आहे. ज्यात मतदाराच्या फोटोसह मतदार यादीचा भाग क्रमांक, अनुक्रमांक व मतदान केंद्राचा पत्ता दर्शविला आहे. तथापि बंद घरे किंवा स्थलांतरित मतदार यांना ती पोहोचली नसेल तर मतदानाच्या दिवशी मतदान यादीत नाव शोधण्याकरिता मतदान केंद्राच्या बाहेर मदत कक्ष स्थापन केला आहे.

जर आपले नाव मतदार यादीत असेल तरच आपल्याला मतदान करता येईल. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result