महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शिस्त आणि पारदर्शकता ठेवून काम केल्यास संस्था यशस्वी होते- पालकमंत्री पंकजा मुंडे रविवार, १३ ऑगस्ट, २०१७
बीड, दि. 13 :- शिस्त आणि पारदर्शकता ठेवून पतसंस्थांनी काम केल्यास त्या संस्था यशस्वी होण्यास कोणतीही अडचण येणार नाही. यासाठी पतसंस्थांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी केले.

वडवणी येथील रामलिंग नागरी सहकारी पतसंस्था म. स्थलांतर व उद्घाटन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या.

या कार्यक्रमास कर्नाटक राज्यातील हंपी येथील मठाधिपती श्री श्री श्री दयानंदपुरी महाराज, आमदार आर.टी. देशमुख, बीड नगर पलिकेचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, माजी आमदार केशवराव आंधळे, जि.प.चे समाज कल्याण सभापती संतोष हंगे, वडवणीच्या नगरध्यक्षा मंगलताई मुंडे, उपनगराध्यक्षा वर्षाताई वारे, ह.भ.प. नामदेव महाराज लबडे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे, ह.भ.प. ज्ञानोबा माऊली बेदरकर, ह.भ.प. नवनाथ महाराज चिनके, अनिल जगताप, अरुणराव वरोडे, बँकेचे अध्यक्ष हनुमंतराव डिगे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलतांना पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, रामलिंग नागरी सहकारी पतसंस्था म. मागील पंचवीस वर्षापासून वडवणी सारख्या ठिकाणी सुरुवात करुन यशस्वीपणे वाटचाल करत आहे. आज या संस्थेला 70 लाख रुपयांचा नफा झाला असून हे काम उल्लेखनीय आहे. संस्थेने गोर-गरीब गरंजू नागरिकांना आपल्या संस्थेमार्फत वेळोवेळी कर्ज उपलब्ध करुन दिल्यामुळे या संस्थेविषयी नागरिकांमध्ये विश्वास वाढण्यास मदत झाली आहे. शिस्तबध्द व पारदर्शकपणे काम केल्यामुळे ही संस्था यशस्वीपणे वाटचाल करत आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

वडवणी टेरीकॉट कापड मागील कालावधीत खुप लोकप्रिय होते. येथे कापड विणकाम करणाऱ्या कामगाराची संख्या मोठ्या प्रमाणात असून अधुनिकतेच्या काळामध्ये कपडा विनकामाचा उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने येथील कामगारांपुढे त्यांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा उद्योग जिवंत ठेवण्यासाठी शासनस्तरावरुन योग्य त्या उपाय योजना करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मठाधिपती श्री श्री श्री दयानंदपुरी महाराज, आ. आर.टी. देशमुख, बीड नगर पलिकेचे नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे, अरुणराव वरोडे यांचेही समयोचित भाषणे झाली.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे अध्यक्ष हनुमंतराव मुक्ताजी डिगे यांनी केले. या कार्यक्रमात राजाभाऊ मुंडे, दिनकरराव आंधळे, विनायक भिडे, भारत जगताप, अरुण नरवाडे, पंजाबराव म्हस्के, नारायणराव डिगे, कचरु झाडे, दिगाबंर गुरसाळी, सर्जेराव आळणे, नवनाथ म्हेत्रे, बाबासाहेब म्हस्के, शैलजा भंडारे, ईश्वर ढवळशंक,अर्जुन भंडारे यांच्यासह पतसंस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result