महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
अल्पसंख्याकांच्या योजना उर्दू लोकराज्यमार्फत तळागाळापर्यंत - डॉ.गणेश व. मुळे मंगळवार, ०१ ऑगस्ट, २०१७
  • रोह्यातील अंजुमान माध्यमिक विद्यालयात उर्दू लोकराज्य मेळावा

नवी मुंबई :
उर्दू लोकराज्य हे शासन आणि जनता यांच्यातील दुवा असून, अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने राबविलेल्या योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्यास मदत होईल, असा विश्वास कोकण विभागाचे उपसंचालक डॉ.गणेश व. मुळे यांनी आज येथे व्यक्त केला.

कोकण विभागस्तरिय उर्दू लोकराज्य मेळावा येथील अंजुमान उर्दू माध्यमिक विद्यालय येथे आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) डॉ. गणेश व.मुळे, यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य वसीम मुलहक सातारेकर हे होते. कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मिलिंद अष्टिवकर, जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे अनिरुद्ध अष्टपुत्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.मुळे यांनी सांगितले की, भाषा शिकणे हे व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक आहे. उर्दू लोकराज्य हे समाजातील उर्दू भाषिक घटकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांसोबतच आपल्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक माहितीही पोहोचविण्याचे काम करते. लोकराज्य वाचणे ही एक चांगली सवय असून स्पर्धा परिक्षांसाठीही हे मासिक उपयुक्त आहे. यावेळी प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना लोकराज्य अंक भेट देण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य वसीम मुलहक सातारेकर यांनी केले. सूत्रसंचालन सलीम उल्डे यांनी केले. शैलजा पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा माहिती अधिकारी, रायगड मिलींद दुसाने यांनी केले होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कोकण भवन येथील सहाय्यक संचालक शैलजा पाटील तसेच हिरामण भोईर, राजेंद्र मोहिते, विठ्ठल बेंदुगडे, अशोक मोरे यांनी तसेच विद्यालयाच्या श्रीमती तबस्सुम दापोलकर, रमजान उस्ताद, मुश्तारी रोहेकर यांनी परिश्रम घेतले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result