महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
रत्नागिरीचा सर्वांगिण प्रगतीचा आलेख असाच पुढे नेऊ - पालकमंत्री रवींद्र वायकर बुधवार, ०१ मे, २०१९
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा शानदार वर्धापनदिन सोहळा

रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्याने साहित्य, कला आणि क्रीडा क्षेत्रात केलेली कामगिरी सर्वोत्तम अशीच आहे. या पुढील काळातही प्रगतीचा आलेख पुढे नेताना सामाजिक एकोपा राखू या, असे आवाहन राज्याचे गृहनिर्माण, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी आज येथे केली.

राज्य स्थापनेचा ५९ वा वर्धापनदिन आज येथील पोलीस परेड ग्राऊंडवर पार पडला. यावेळी पालकमंत्री वायकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांची प्रमुख उपस्थिती होती.

ध्वजारोहणानंतर पोलीस दलाचे शानदार संचलन झाले. पोलीस दलाच्या मानवंदनेचा स्वीकार पालकमंत्र्यांनी केला. तत्पूर्वी त्यांनी परेडची पाहणी केली.

पोलीस दलातील २१ उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांना पोलीस महासंचालकांचे विशेष पदक प्राप्त झाले आहे. अशा २१ जणांचा सत्कार पालकमंत्री महोदयांच्या हस्ते झाला. तसेच क्रीडा क्षेत्रात रत्नागिरीचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणाऱ्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या ऐश्वर्या, मैत्रियी गोगटे तसेच पॅराॲथलिट सही शिंगाडे आदिंचाही गौरव पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नावे अशी गडचिरोली जिल्ह्यात 3 वर्षे सेवा बजावत असताना दाखविलेल्या कठीण व खडतर कामगिरी बद्दल पोलीस महासंचालक यांच्याकडून विशेष सेवा पदक संदीप कांगणेकर, पोलीस उपनिरीक्षक तसेच संजय ल. देसाई, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, आनंदराव मा. पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सुनिल श्री.गुरव, पोलीस हवालदार, अनिल पां. चांदणे, पोलीस हवालदार, संदेश सु. सांरग, पोलीस हवालदार, अजित व. किर, पोलीस हवालदार , अशोक स. गायकवाड, पोलीस हवालदार, संजय शि. साळवी, पोलीस हवालदार, किशोर शां. धातकर, पोलीस हवालदार, संतोष आ. गायकवाड, पोलीस हवालदार, प्रभाकर रा. सागवेकर, पोलीस हवालदार, समिर प. सावंत, पोलीस हवालदार, शरद शि. घाग, पोलीस हवालदार, सुहास द. लिंगायत, पोलीस हवालदार, उदय द. वाजे, पोलीस हवालदार, संदीप कोळंबेकर, पोलीस हवालदार, काशिनाथ म. गुरव, पोलीस हवालदार, विनय वि. नरवणे, महिला पोलस हवालदार, संजय सि. जाधव, चालक पोलीस हवालदार, सचिन शि. साळवी, चालक पोलीस नाईक, संदीप ग. वांगणकर, पोलीस उपनिरीक्षक.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result