महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
राजधानीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा बुधवार, ०१ मे, २०१९


नवी दिल्ली :
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५९ वा वर्धापन दिन महाराष्ट्र सदन येथे आज उत्साहात साजरा करण्यात आला. निवासी आयुक्त समीर सहाय यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.


कोपर्निकस मार्ग स्थित आणि कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत गायनासह उपस्थितांनी ध्वज वंदन केले. या कार्यक्रमास सहायक आयुक्त सुमन चंद्रा आणि विजय कायरकर, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे, जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा आणि महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी, महाराष्ट्रातून आलेले व महाराष्ट्र सदनात निवासी असणारे अभ्यागत, दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, दिल्लीत विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result