महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले मनपा क्षेत्रातील रस्ते कामांचे भूमिपूजन सोमवार, ०१ जानेवारी, २०१८
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील विविध रस्ते विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

पालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतुद या योजनेंतर्गत मंजुर झालेल्या टिळक चौक ते महानगरपालिका रस्ता, टिळक चौक ते कुंभारखिंड ते गावभाग अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे, मारूती चौक ते गावभाग जैनवस्तीकडे जाणारा रस्ता, मारूती चौक ते बालाजी चौक रस्ता, पटेल चौक ते कॉलेज कॉर्नरपर्यंत रस्ता, गावभाग सांगली शहर येथे 11 केव्ही व 440 व्हॉल्ट भूमीगत वीज वाहिनीच्या कामाचा शुभारंभ आदि विकास कामांचे उद्घाटन पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result