महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
निवडणूकविषयक साहित्यावर मुद्रक तथा प्रकाशकाचे नाव आवश्यक शुक्रवार, १५ मार्च, २०१९

साहित्य प्रकाशित केल्यापासून 3 दिवसाचे आत करारपत्रासह निवडणूक शाखेत सादर करावे

बुलडाणा : भारत निवडणूक आयोगाने सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2019 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. तसेच आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. आचारसंहिता कालावधीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राहणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील सर्व मुद्रक व प्रकाशक यांनी लोकप्रतिनिधित्व अधिनियम कलम 127 ए मधील तरतूदींचे पालन करणे आवश्यक आहे. 

तसेच लोकसभा निवडणूक निर्भय व नि:पक्षपातीपणे पार पाडण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व मुद्रक व प्रकाशक यांनी निवडणुकीशी संबधित साहित्य मुद्रीत व प्रकाशित करताना मुद्रक/ प्रकाशक यांचे साहित्यावर नाव व पत्ता असणे बंधनकारक आहे. मुद्रकाजवळ प्रकाशकाच्या स्वाक्षरीचे करारपत्र असणे आवश्यक आहे. निवडणुकीचे साहित्य प्रकाशित केल्यापासून तीन दिवसांचे आत प्रकाशित साहित्याच्या तीन प्रती व मुद्रकाला प्रकाशकाने प्राधिकृत केल्याचे करारपत्र निवडणूक शाखेत सादर करणे आवश्यक आहे. तसेच छापील निवडणूक साहित्याच्या 4 प्रती व सदर निवडणूक साहित्य छापण्याकरीता आलेला खर्चाचा तपशिल निवडणूक शाखेस सादर करणे आवश्यक आहे.  फौजदारी प्रक्रीया संहीता कलम 144 (1) च्या आदेशान्वये जिल्ह्यात उपरोक्त नियम लागू करण्यात आले आहेत. सदर आदेश संपुर्ण जिल्ह्याकरीता  लागू राहील. या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे  निदर्शनास आल्यास  भारतीय दंड संहीता 1860 चे कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येईल, असे  जिल्हादंडाधिकारी डॉ निरूपमा डांगे यांनी कळविले आहे.   

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result