महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
आधुनिक युगात नवीन समाज माध्यमांचा सकारात्मक वापर करा - अपर जिल्हाधिकारी संजय दैने बुधवार, १४ मार्च, २०१८
सोशल मीडिया महामित्र उपक्रम

वर्धा :
आधुनिक युगात नवीन समाज माध्यमांचा वापर चांगला किंवा वाईट करणे हे पूर्णत: व्यक्तीवर अवलंबून आहे. समाज माध्यम हे आजच्या आधुनिक युगात संपर्काचे अतिशय प्रभावी माध्यम असून याचा उपयोग तरुण पिढी मोठ्या प्रमाणात करीत आहे. या माध्यमांचा सकारात्मक आणि विधायक वापर करण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाने तरुण पिढीला जागृत करण्यासाठी राबविलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून यामुळे विवेकी समाज घडविण्यास मदत होईल, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे वतीने राज्यभर सोशल मीडिया महामित्र उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन जिल्हा माहिती कार्यालयाचे वतीने सोशल मीडिया संवाद सत्राचे आयोजन आज न्यू आर्टस व कॉमर्स महाविद्यालयात करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थिताना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी स्मिता पाटील, औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्रणिता कश्यप, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे उपस्थित होत्या.

कोणताही शोध लागल्या नंतर त्याचे चांगले किंवा वाईट परिणाम दिसून येतात. सोशल मीडियाचा शोध सुध्दा याच प्रकारात गणल्या जाईल. पण त्याचा वापर कोण आणि कशा पद्धतीने करतो. यावर समाज माध्यमाचे यशापयश अवलंबून आहे. मनुष्यप्राणी हा सुसंस्कृत आणि बुध्दीमान असून इतर प्राण्यापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे समाज माध्यमाचा वापर करताना सुध्दा सद्सदविवेक बुध्दीचा वापर करुन या माध्यमाचा सकारात्मक पद्धतीने आणि काळजीपूर्वक उपयोग करावा, असे आवाहन श्री. दैने यांनी केले.

यावेळी स्मिता पाटील यांनी माहिती व जनसंपर्क विभागाने राबविलेला सोशल मीडिया महामित्र हा उपक्रम शासनाची ध्येय धोरणे आणि योजना तळगाळातील गरजु व वंचित नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी अतिशय विधायक ठरेल असे मत व्यक्त केले. राज्यस्तरावर सहभागी होण्यासाठी निवडल्या जाणाऱ्या तरुणांनी वर्धा जिल्ह्याचे उत्तम प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

या संवाद सत्रात सहभागी झालेल्या युवकांना सायबर सुरक्षितता या विषयावर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सायबर सेलचे कुलदीप टांकसाळे व अक्षय राऊत यांनी पॉवर प्रेजेन्टेशनद्वारे सादरीकरण करुन मार्गदर्शन केले.

सोशल मीडिया संवाद सत्रात सहभागी झालेल्या सर्व युवकांना आणि परिक्षकांना यावेळी मान्यवरांचे हस्ते माहिती व जनसंपर्क विभागाने प्रकाशित केलेले महाराष्ट्र वार्षिकी हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले. या संवाद सत्रातून जिल्ह्यातील चार युवकांची निवड होऊन त्यांना राज्यस्तरीय चर्चासत्रात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. राज्यस्तरीय चर्चासत्रात विजेत्यांचा थेट मुख्यमंत्र्याशी संवाद होणार आहे.

यावेळी प्रा. आश्विनी भेंडे, गोरक्ष महात्मे, दीपाली काळे, अबोली मिथे, स्वाती लांबट, पायल सोरते, नंदिनी किटे व मयुरी मानकर यांनी परीक्षक म्हणून तर लोकेश गांडोळे, शेख मोहेद, प्रसाद पाटील, अतुल कातरकर, प्रवीण पोहाणे, अश्विन सव्वालाखे, हेंमत ब्राम्हणकर, प्रशांत सिसोदे यांनी निरीक्षक म्हणून काम केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी न्यु आर्ट व कामर्स महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत कडवे, डॉ. प्रशांत टाकधट यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रफुल खंडारे, दिलीप बोंडसे, संजय धमाने, संजय चिट्टवार, राजेश बावने यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे यांनी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result