महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
दिव्यांगाचे 100 टक्के मतदान होण्यासाठी अकोला शहरातुन जनजागृती रॅली मंगळवार, १६ एप्रिल, २०१९


अकोला :
अकोला महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी/अधिकारी व दिव्यांग बेरोजगार संघटना जिल्हा शाखा अकोला यांच्यावतीने दिव्यांगाचे 100 टक्के मतदान होण्यासाठी अकोला शहरातून जनजागृती रॅली आज मंगळवार 16 एप्रिल 2019 रोजी सकाळी काढण्यात आली. या रॅलीला निवडणूक निरीक्षक सामान्य विनोद सिंह गुंजीयाल व जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, निवडणूक निरीक्षकांचे संपर्क अधिकारी गोपाळ माळवे, नोडल अधिकारी तथा तहसीलदार मनोज लोणारकर,मनपाचे नोडल अधिकारी पूनम कळंबे, सहाय्यक नोडल अधिकारी वर्षा खोब्रागडे, दिव्यांगाचे आयकॉन प्रा.विशाल कोरडे तसेच दिव्यांग कर्मचारी/अधिकारी संघटेनेचे जिल्हाध्यक्ष संजय बरडे, सचिव मो.अ.अजीज, अविनाश वडतकर, रवींद्र देशमुख, प्राथमिक विभाग अध्यक्ष दिलीप सरदार, सचिव रवींद्र सिरसाट, बेरोजगार जिल्हाध्यक्ष सुधीर कडू, सचिव श्रीकांत देशमुख, माध्यमिक जिल्हाध्यक्ष जावेद एकबाल, राजीव सोनोने, नंदकिशोर वैराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सदर रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय येथून होऊन सदर रॅली सिटी कोतवाली मार्गे मनपा समोरुन गांधी चौक मार्गाने बस स्टॅन्ड चौक, अशोक वाटीका व पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे विसर्जित करण्यात आली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result