महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
नागरिकांनी `ट्रू कॉलर` सारखे ॲप वापरु नये - कुलदीप टांकसाळे बुधवार, २४ जानेवारी, २०१८
पत्रकारांसाठी सायबर सुरक्षा जागृती कार्यशाळा

वर्धा :
केंद्र शासनाने देशातील 42 ॲपवर बंदी घातलेली असून यापैकी `ट्रू कॉलर` हा सुध्दा ॲप आहे. ट्रू कॉलर ॲप डाऊन लोड केल्यास नागरिकांची फसगत होऊन नुकसान होऊ शकते, अशी माहिती सायबर विशेषज्ञ कुलदीप टांकसाळे यांनी आज पत्रकारांसाठी आयाेजित सायबर सुरक्षेविषयी जाणीव जागृती कार्यशाळेत दिली.

पोलीस विभाग व जिल्हा माहिती कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. म्हणाल्या, सध्या तरुण युवा पिढीला मोबाईलचे वेड लागलेले असून मोबाईलच्या वेडामुळे आपली गोपनीय माहिती जाहीर करुन स्वत:चे नुकसान करीत आहे. नागरिक म्हणून आपण विविध मोबाईल ॲप्स आणि वेबसाईटवर वैयक्तिक माहिती देताना तिचा गैरवापर होणार नाही याची खात्री असेल तरच माहिती द्यावी.

कार्यशाळेत कुलदीप टांकसाळे यांनी सायबर गुन्हे कसे घडतात याचे सादरीकरण करतांना सांगितले कि, https असलेली संकेत स्थळे वैध असतात. अनेकदा बनावट संकेत स्थळाद्वारे नागरिकांना फसविले जाते. यासाठी नागरिकांनी संकेत स्थळावर माहिती देताना ते बनावट नाही याची खात्री करावी. बॅकिंगचे व्यवहार करताना आपल्या मोबाईवर आलेला ओटीपी कुणालाही सांगू नये. नागरिकांची एटीएमव्दारे बँक खात्याची फसगत झाली असल्यास 4 ते 24 तसात सायबर सेलकडे तक्रार दाखल करावी. यासाठी बॅंक स्टेटमेन्ट सोबत न्यावे. यामुळे गुन्हेच्या तपास लवकर करुन गुन्हेगारास शोधण्यास मदत होते.

यावेळी श्री. पोटे यांनीही विचार व्यक्त केले. मनिषा सावळे यांनी ट्रान्सफारर्मिंग महाराष्ट्र अंतर्गत पत्रकार आणि प्रसार माध्यमासाठी सायबर जाणीव जागृती उपक्रम महाराष्ट्र सायबरचे प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेशसिंह यांचे संकल्पनेतून राबविण्यात येते आहे. पत्रकारांच्या मार्फत सायबर सुरक्षेविषयी माहिती मिळावी या मागचा उद्देश असल्याचे प्रास्ताविकातून सांगितले.

बंदी घालण्यात आलेल्या ॲपमध्ये weibo, wechat, shareit, truecaller, uc news, uc browser, beautyplus, newsdog, viva video-qu video inc, parallel space,apus browser,perfect corp,virus cleaner.h security lab, cm browser, mi community,du recorder,vault hide-nq mobile security, youcam makeup, mi store,cachecleaner du apps studio, du battery saver, du cleaner,du privacy, 360 security, du browser, clean master-cheetah mobile, baidu translate, baidu map, wonder camera-baidu inc, es file explorer, photo wonder, qq international, qq music, qq mail, qq player, qq newsfeed, wesync, qq security centre, selfie city, mail master, mi video call-xiaomi, qq launcher चा समावेश आहे. कार्यशाळेला पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result