महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
कोंकण विभागीय स्तरावरील प्रजासत्ताक दिन : राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण शुक्रवार, २६ जानेवारी, २०१८
नवी मुंबई : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कोकण विभागीय स्तरावरील ध्वजारोहण समारंभ आज नवी मुंबई पोलीस मुख्यालय मैदान, सेक्टर-17, कळंबोली येथे साजरा झाला. महिला व बालविकास राज्यमंत्री श्रीमती विद्या ठाकूर यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण झाले. उपस्थित मान्यवर, नागरिक आदींना श्रीमती विद्या ठाकूर यांनी यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या समारंभास आमदार श्रीमती मंदा म्हात्रे, नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर श्री.जयवंत सुतार, पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ.कविता चौतमोल, कोकण विभागीय आयुक्त डॉ.जगदीश पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (कोकण परिक्षेत्र) नवल बजाज, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.रामास्वामी एन. पनवेल महानगरपालिका आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे, नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, नवी मुंबई श्री.प्रशांत बुरडे, माजी पोलीस आयुक्त रामराव वाघ आदी उपस्थित होते.

यावेळी राज्य राखीव पोलीस पथक, जलद प्रतिसाद पथक, दंगा नियंत्रण पथक, नवी मुंबई पोलीस पथक, नवी मुंबई पोलीस महिला पथक, नवी मुंबई पोलीस प्लाटून, नवी मुंबई पोलीस वाहतूक पथक, अग्निशमन दल पथक , नवी मुंबई पोलीस बॅण्ड पथक, मार्क्स मॅन वाहन, आर.आय.व्ही. वाहन , वज्र वाहन, बी.डी.डी.एस.वाहन, वरूण वाहन, अग्निशमन दल वाहन, आपतकालिन वैद्यकीय सेवा वाहन व सुधागड हायस्कूल कळंबोली या विद्यालयाच्या विद्यार्थी आदिंनी संचलनाद्वारे प्रमुख अतिथी श्रीमती विद्या ठाकूर यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

महात्मा गांधी मिशनचे हायस्कूल, नेरुळ, मनपा नवी मुंबई शाळा क्र.36 कोपरखैरणे, भारती विद्यापीठ सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई, आर.सी.एल.मोनामी मराठी शाळा तुर्भे, आर.सी.एल.मोनामी इंग्रजी शाळा तुर्भे, मनपा नवी मुंबई शाळा क्र.31 कोपरखैरणे, मनपा नवी मुंबई माध्यमिक विद्यालय, तुर्भेस्टोअर, मनपा नवी मुंबई शाळा क्र.42 घणसोली, मनपा नवी मुंबई शाळा क्र.6 करावे, मनपा नवी मुंबई शाळा क्र.4 सीबीडी बेलापूर, मनपा नवी मुंबई शाळा क्र.18 सानपाडा, ज्ञानपुष्प विद्यालय, सीबीडी बेलापूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने त्यांना प्रोत्साहन दिले.

या कार्यक्रमास उपायुक्त (सामान्य) श्री.महेंद्र वारभूवन, उपायुक्त (महसूल) श्री.सिध्दराम सालीमठ, उपायुक्त (करमणूक) श्री.शिवाजी कादबाने, उपायुक्त (पुर्नवसन) श्री. अरुण अभंग, उपायुक्त (पुरवठा) दिलीप गुट्टे, उपायुक्त (नियोजन) श्री.बी.एन.सबनीस, उपायुक्त (विकास) श्री.गणेश चौधरी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, वरिष्ठ पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी व कर्मचारी, शालेय विद्यार्थी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शुभांगी पाटील आणि निंबाजी गीते यांनी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result