महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण जिल्हाधिकारी अनिल पवार यांच्या हस्ते मंगळवार, १५ ऑगस्ट, २०१७
बीड : स्वातंत्र्य दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी अनिल पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती सविता गोल्हार, उपाध्यक्षा श्रीमती जयश्री मस्के, जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, बीडचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. जिल्हाधिकारी अनिल पवार यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेवून विचारपूस केली.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन 2016-17 मधील जिल्हास्तरीय पुरस्कार पात्र ग्रामपंचायतीना यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये ग्रामपंचायत टाकळी देशमुख ता.परळी सरपंच श्रीमती सुवर्णा भीकाजी कलगुडे, ग्रामसेवक प्रकाश बंकटराव करपे. द्वितीय पुरस्कार-ग्रामपंचायत ताडसोन्ना ता.बीड सरपंच श्रीमती द्रौपदी सोमनाथ माने, ग्रामसेवक संतोष नाथा शिंदे. तृतीय पुरस्कार विभागून- ग्रामपचायत गुंधावाडी ता.बीड सरपंच आप्पासाहेब नामदेव माने, ग्रामसेवक इनकर पुष्पराज विश्वनाथ. ग्रामपंचायत देवगाव ता.वडवणी सरपंच श्रीमती कैवल्याबाई रघुनाथ सुरवसे. ग्रामसेवक रामहरी व्यंकटी मंत्री यांना प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह व पुष्पगुछ देवून सत्कार करुन पुरस्कार देण्यात आले.

शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात आणि विभागात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. सूत्रसंचालन ॲड. संगीता धस व गणेश धस यांनी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result