महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
आपल्या योजना पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते प्रकाशन मंगळवार, ०३ ऑक्टोंबर, २०१७
वर्धा : आपल्या योजना या पुस्तकांच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची माहिती ग्रामीण भागातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून गरजूना योजनांचा लाभ घेता यईल. हे पुस्तक सर्व नागरिकांपर्यंत पोहोचावे अशी अपेक्षा व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी या पुस्तकाबद्दल जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले.

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या संकल्पनेतून जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या आपल्या योजना पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते महात्मा गांधी जयंती दिनी सेवाग्राम विकास आराखडा कार्यक्रमाचे भूमीपूजन प्रसंगी करण्यात आले. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, वित्त, नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जा व पर्यटन मंत्री मदन येरावार, खासदार रामदास तडस, आमदार डॉ.पंकज भोयर. समीर कुणावार, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल आदी यावेळी उपस्थित होते.

आपल्या योजना हे पुस्तक सर्व नागरिकांसाठी अतिशय उपयुक्त आहे. या पुस्तकामध्ये सर्व विभागाच्या योजनांची माहिती दिली आहे. श्रेणीनिहाय जसे अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती. अल्पसंख्यांक इतर मागासवर्ग, दारिद्र्य रेषेखालील, जेष्ठ नागरिक, शेतकरी, शेतमजूर, महिला, सुशिक्षित बेरोजगार, निराधार, किशोरवयीन व युवक, विद्यार्थी, अनाथ, मच्छीमार अशा एकूण 33 श्रेणी निहाय योजनांची माहिती दिली आहे. त्यामुळे प्रत्येक घटकाला त्याच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती सहजपणे एकाच ठिकाणी उपलब्ध होते. यामध्ये योजनेचे स्वरुप, आवश्यक कागदपत्रे आणि संपर्क व्यक्तींची माहिती दिली असल्यामुळे नागरिकांना एखाद्या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित विभागाकडे थेट अर्ज करता येऊ शकतो. तसेच यामध्ये जिल्हास्तरीय कार्यालयाचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी यांनी विकसित केलेले आपल्या योजना हे ॲप कसे वापरावे याबद्दल सुध्दा माहिती देण्यात आली आहे.

लवकरच हे पुस्तक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना संकेतस्थळावर सुध्दा सर्व योजनांची माहिती उपलब्ध होईल.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result