महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची ऐतिहासिक रंकाळा तलावास भेट शुक्रवार, २२ फेब्रुवारी, २०१९


कोल्हापूर :
महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज ऐतिहासिक रंकाळा तलावास भेट देऊन तलावाची पाहणी केली, त्यांच्यासमवेत श्रीमती विनोधा रावही उपस्थित होत्या.

यावेळी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव यांनी राज्यपाल चे. विद्यासागर राव आणि श्रीमती विनोधा राव यांना रंकाळ्याचे ऐतिहासिक महत्त्व आणि पार्श्वभूमी सांगितली. राज्यपालांनी रंकाळा टॉवर येथून संपूर्ण रंकाळ्याची पाहणी केली. रंकाळ्यावरील संध्यामठ, शालिनी पॅलेस, विस्तीर्ण पाणी, मनोरे यांचीही माहिती घेतली.

यावेळी महापौर सरिता मोरे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अतिरिक्त महापालिका आयुक्त श्रीधर पाटणकर आदी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result