महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी जीतेंद्र पापळकर सोमवार, ११ मार्च, २०१९अकोला : भारत निवडणूक आयोगाने दिनांक १०/३/२०१९ रोजी आगामी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे तसचे तात्‍काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू करण्‍यात आलेली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्‍हा प्रशासनाने निवडणूक पूर्व तयारी केलेली असून निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्‍या कार्यक्रमानुसार ०६ - अकोला लोकसभा मतदारसंघाकरिता निवडणूकीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी जीतेंद्र पापळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

1

निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्‍द करण्‍याचा व नामनिर्देशनपत्र दाखल करण्‍याचा दिनांक

१९ मार्च २०१९ (मंगळवार)  

2

नामनिर्देशनपत्र सादर करण्‍याचा अंतिम दिनांक

२६ मार्च २०१९ (मंगळवार) 

3

नामनिर्देशनपत्र छाननी करण्‍याचा दिनांक

२७ मार्च २०१९ (बुधवार) 

4

उमेदवारी मागे घेण्‍याचा अंतिम दिनांक

२९ मार्च २०१९ (शुक्रवार) 

5

मतदानाचा दिनांक

१८ एप्रिल २०१९ (गुरुवार) 

6

मतमोजणीचा दिनांक

२३ मे २०१९    (गुरुवार) 

 

दिनांक ३१/०१/२०१९ रोजी  प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्‍या अंतिम मतदार यादीनुसार अकोला जिल्‍ह्यातील मतदारांचा तपशिल खालील प्रमाणे आहे.

 

अ.क्र.

विधानसभा मतदारसंघ

एकुण मतदान केंद्रांची संख्‍या

एकुण मतदारांची संख्‍या

पुरुष

महिला

इतर

सर्विस वोटर

प्रवासी मतदार

एकुण मतदार

२८ अकोट

331

148699

131504

3

638

0

280844

२९ बाळापुर

335

151959

139003

0

817

0

291779

३० अकोला पश्चिम

283

167061

161188

16

257

0

328522

३१ अकोला पूर्व

350

173865

164158

19

501

04

338547

३२ मुर्तिजापूर

381

163383

154913

05

551

0

318852

३३ रिसोड

326

157609

141393

01

404

0

299407

 

एकुण

2006

962576

892159

44

3168

04

1857951

 

उपरोक्‍त प्रमाणे एकुण मतदारांची संख्‍या असून मतदार यादीत निरंतर नाव नोंदणी प्रकिये अंतर्गत मतदारांची नाव नोंदणी सुरु असून त्‍यामुळे वाढणाऱ्या मतदारांची संख्‍या विचारात घेता एकुण ७१ सहायक मतदान केंद्राचे प्रस्‍ताव मुख्‍य निवडणूक अधिकारी मुंबई यांना सादर करण्‍यात आला आहे. उपरोक्‍त मतदारांपैकी ५०७४ दिव्‍यांग मतदार असून यंदाचे निवडणुकीत निवडणूक आयोगाचे आदेशानुसार दिव्‍यांग मतदारांसाठी मतदान केंद्राचे ठिकाणी रॅम्‍प  तयार करणे बाबत तसेच व्‍हील चेअर उपलब्‍ध ठेवणे बाबत सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांना सुचना देण्‍यात आलेल्‍या आहेत.

या व्‍यतिरीक्‍त टोल फ्री असलेला १९५० हा दूरध्‍वनी क्रमांक निवडणूक विषयक कोणतीही तक्रार नोंदविण्‍या करिता किंवा माहिती विचार करण्‍या करिता कार्यान्वित करण्यात आला आहे. आचारसंहितेच्‍या कालावधीत राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी काय करावे व काय करु नये या बाबतची सविस्‍तर माहिती राजकीय पक्षां सोबत आयोजित सभेत देण्‍यात आलेली आहे. त्‍याच प्रमाणे राजकीय पदाधिकारी यांचे वाहन जिल्‍हाधिकारी कार्यालयात जमा करणे बाबत संबंधितांना पत्राव्‍दारे निर्देश देण्‍यात आले आहेत.


यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद
, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले आदीसह नोडल अधिकारी व निवडणुक नायब तहसीलदार सतीश काळे उपस्थित होते. 

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result