महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
लोकराज्यच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेषांकाचे ठाणे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रकाशन सोमवार, ०९ एप्रिल, २०१८
ठाणे : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने काढण्यात आलेल्या ‘महामानवाला अभिवादन’ या लोकराज्यच्या विशेषांकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. नारनवरे हे पालघरचे जिल्हाधिकारी असून त्यांच्याकडे ठाण्याच्या जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे.

या प्रकाशनप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील, उपजिल्हाधिकारी निवडणूक फरोग मुकादम उपजिल्हाधिकारी नंदकुमार कोष्टी, जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे, जिल्हा माहिती अधिकारी अनिरुध्द अष्टपुत्रे यांची उपस्थिती होती.

‘महामानवाला अभिवादन’ हा अंक संग्राह्य असून या विशेषांकामध्ये बाबासाहेबांचे संपूर्ण जीवन आपल्यासमोर उलगडते, असे जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यावेळी म्हणाले. लोकराज्यचा हा विशेषांक प्रत्येक वृत्तपत्र विक्रेत्यांकडे विक्रीसाठी ठेवण्यात आला असून जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, स्टेट बँक इमारतीवर दुसरा मजला, ठाणे पश्चिम या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result