महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शहापूरमध्ये गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची कामे सीएसआरच्या माध्यमातून जोमाने सुरु शनिवार, ०६ मे, २०१७
  • जिल्हाधिकारी ठाणे यांचा स्तुत्य उपक्रम
  • कायम टंचाईग्रस्त गावांमध्ये कामे सुरु

ठाणे : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर ठाणे जिल्ह्यातही या कामाला चांगली सुरुवात झाली असून काही कंपन्यांनी सीएसआरच्या माध्यमातून कामांना सुरुवातही केली असल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर हे या संदर्भात दैनंदिन आढावा घेत असून त्यांच्या आवाहनाला उद्योग समूहांनी देखील चांगला प्रतिसाद दिला आहे.

वेस्टर्न इंटरकुल कंपनी, जेको लि, कर्म रेसिडेन्सी, जिंदाल, लिबर्टी, एस्सेल प्रो पँक, अजमेरा या व इतर उद्योग समूहांनी सीएसआरच्या माध्यमातून कामांना प्रारंभही केला आहे. टंचाईग्रस्त गावपाड्यांपैकी गाव मांजरे, वेळुक ढेंगणमाऴ, कोळीपाडा, वाशाळा, आघाणवाडी, वसारवाडी, कसारा खु, दांड, उम्रावणे, चिंतामणवाडी, टोकरवाडी, गणेशवाडी, लेनाडवाडी, दत्तगुरुवाडी, शेंद्रुण कातकरीवाडी, गुठ्याचीवाडी, पारधवाडी, पोकळ्याचीवाडी, काटीचा पाडा, मोखावणे शिवाजीनगर, पाटीलवाडी, गोपाळपाडा, कुंडन, करंजपाडा, वरस्कोळवाडी, मुसऴेपाडा, हेदुचापाडा, आंबातपाडा आदी आदीवासी गाव पाड्यांत विहीर बांधणे, बोअरवेल, नळपाणी योजना, जलकुंभ, गाळ काढणे, विहीर दुरुस्ती आदी कामे यामध्ये हाती घेण्यात आली असून टंचाईग्रस्त गावपाड्यांना ५० साठवण टाक्यांचे वितरण करण्यात आले आहे.

याशिवाय बोअरवेल, नळपाणी योजना, नदी पाञ व तलावांतील गाळ काढणे, सौर योजना या व इतर कामांच्या माध्यमातून जलसाठे वाढविण्याकरिता एक पाऊल पुढे टाकले आहे.

नुकतीच भिवंडी प्रांताधिकारी डॉ. संतोष थिटे यांनी तालुक्यातील उद्योग समूहांचे व्यवस्थापक, अधिकारी यांची बैठक घेत कामाची विभागणी करुन दिली होती. त्यानुसार शहापूर तहसीलदार रवींद्र बावीसकर यांनी चरीव व कानवी नदी पाञातील गाळमुक्त योजनेचा शुभारंभ केला. यावेळी नायब तहसीलदार संदीप थोरात, मंडळ अधिकारी के डब्ल्यु मेंगाळ, खंडु विशे, तलाठी शेटे, चरीव ग्रामदान मंडळाचे अध्यक्ष दत्ताञय पानसरे, पञकार अरविंद भानुशाली, पोलीस पाटील महेश पानसरे आदी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result