महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
परळी येथे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते विविध योजनेच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटप शनिवार, ०२ फेब्रुवारी, २०१९

बीड : पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते परळी येथे आयोजित  संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, श्रावण बाळ सेवा योजना आणि उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्र व गॅसचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास तहसीलदार शरद झाडके, शिवाजीराव गुट्टे, जुगलकिशोर लोहिया, बंकटराव कांदे, श्रीहरी मुंडे, श्रीराम मुंडे, पं. स. सदस्य मोहन आचार्य, भास्कर फड आदींची प्रमुख उपस्थित होती. 

यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, शासनाच्या निराधारांसाठी अनेक कल्याणकारी योजना असून त्याचा लाभ पात्र लाभार्थ्यांना झाला पाहिजे. आज परळी तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना आणि उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते मंजुरी पत्राचे व गॅसचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. संजय गांधी योजना तालुका समितीच्या बैठकीमध्ये संजय गांधी निराधार योजनेचे 450  श्रावण बाळ सेवा योजनेचे 1 हजार 951 लाभार्थींचे अर्ज पात्र ठरविण्यात आले असून या  लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले. ज्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत त्या प्रस्तावही लवकरच मंजूरी देण्यात येईल असेही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना तहसीलदार शरद झाडके म्हणाले की, परळी तालुक्यातील मागील वर्षात एकूण 2 हजार 401 प्रस्तावास समितीच्या माध्यमातून मंजूरी देण्यात आली असून परळी तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची एकूण संख्या 4 हजार 565 असून श्रावणबाळ सेवा योजनेची एकूण संख्या 11 हजार 170 एवढी आहे या सर्व लाभार्थ्यांना शासनामार्फत लाभ देण्यात येतो असे त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमास संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष सुधाकर पौळ, सदस्य सुशिला फड, हनुमंत नागरगोजे, दिपक जगतकर, विजय दहिवाळ, अशोक आघाव, बालासाहेब गुट्टे  यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, नागरिक तसेच संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, श्रावण बाळ सेवा योजना आणि उज्ज्वला गॅस योजना लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result