महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मनोरा आमदार निवासच्या पुनर्बांधकामाबाबत करार गुरुवार, १९ जुलै, २०१८
नागपूर : मुंबईतील मनोरा आमदार निवासच्या पुनर्बांधकामाबाबत नॅशनल बिल्डींग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनसमवेत (एनबीसीसी) आज करार करण्यात आला. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विधानभवन येथे हा करार झाला.

परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योग मंत्री सुभाष देसाई, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, मुख्य सचिव डी. के. जैन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, विधीमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, एनबीसीसीचे संचालक निलेश शहा, सरव्यवस्थापक देवेंद्र कुमार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी डॉ. कळसे आणि एनबीसीसीच्या प्रतिनिधी यांनी कराराच्या मसुद्यावर स्वाक्षऱ्या केल्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result