महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महसूल मंत्र्यांकडून भिलवडी प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांचे सांत्वन बुधवार, ११ जानेवारी, २०१७
सांगली : भिलवडी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी माळवाडी येथे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व धीर दिला.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी नगरसेवक निता केळकर उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, आपल्या साधु संतांनी समाजातील जातीयता संपविण्यासाठी चांगला संदेश दिला. त्या संदेशाचे पालन करणे अशा घटनांमध्ये महत्त्वाचे आहे. त्यामुळे अशा घटनांना जातीय रंग देऊन जमाजातील स्वास्थ बिघडवू नये. संतांनी बसवून दिलेली घडी विस्कळीत करू नये. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. अशा प्रकारची घटना कोणा एका जातीवर अन्याय करण्याच्या भूमिकेतून केलेली नसते. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये. याप्रकरणी सखोल चौकशी सुरू असून लवकरच गुन्हेगार सापडतील असेही त्यांनी सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result