महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मतदारांच्या सुविधेसाठी 1950 हा टोल फ्री नंबर मंगळवार, १६ एप्रिल, २०१९

अकोला : अकोला लोकसभा मतदार संघाकरिता दिनांक 18 एपिल 2019 रोजी मतदान होणार आहे. मतदानाचे दिवशी नागरिकांच्या सुविधेकरिता जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अकोला यांचे कार्यालयात 1950 हा टोल फ्री नंबर कार्यन्वित करण्यात आलेला आहे. सदर टोल फ्री नंबर हा 24 तास कार्यरत राहणार असून नागरिकांना/मतदारांना काही अडचण/तक्रार नोंदवायची असल्यास सदर दुरध्वनी नंबरवर नोंदविता येतील तसेच निवडणूक विषयक काही माहिती हवी असल्यास सुध्दा सदर टोल फ्री नंबरचा वापर करता येईल.  या व्यतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य निवडणूक शाखेतील दुरध्वनी नंबर (0724)2438763 वर सुध्दा संपर्क करुन आवश्यक असलेली माहिती विचारता येईल. तरी नागर‍िकांनी सदर सुविधेचा वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जीतेंद्र पापळकर यांनी केले आहे. 

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result