महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शेळगाव येथे विविध शासकीय योजनांचा जनजागृती कार्यक्रम संपन्न बुधवार, १० ऑक्टोंबर, २०१८
उस्मानाबाद : परांडा तालुक्यातील मौजे शेळगाव येथे नुकताच ग्रामपंचायत कार्यालयासमोर जिल्हा माहिती कार्यालय आणि परिवर्तन सामाजिक संस्था, नळदूर्ग, जागृती फाउंडेशन, सावंतवाडी, दीपक भाऊ निकाळजे सामाजिक विकास संघ, चेंबूर, उन्नती महिला ग्रामसंघ, शेळगाव व भरारी महिला ग्रामसंघ माणिक नगर, उमेद अभियान, शेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने लोकराज्यग्राम महिला सक्षमीकरण, आदर्श ग्राम व शासकीय योजनांबद्दलच्या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना मिलिंद सावंत यांनी युवक, तरुणांना वेगवेगळ्या व्यवसायाचे प्रशिक्षण कसे मिळू शकते याबद्दलची माहिती दिली. प्रमुख मार्गदर्शक मनोज सानप यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन, शासकीय योजनेचा लाभ व शासकीय योजनांच्या माहितीसाठी लोकराज्य मासिकाचे वाचन याचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले तसेच गावातील तरुण तरुणी युवक वर्गाने चांगले शासकीय अधिकारी बनण्याचा प्रयत्न करावा, असे प्रोत्साहन दिले. त्यांनी गावातील गरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी शक्य ते सर्व सहकार्य करण्याची जबाबदारी स्वीकारली. यावेळी त्यांनी माहिती व जनसंपर्क विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती सर्वांना सांगितली.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप तर प्रमुख पाहुणे भारतीय स्टेट बँक प्रशिक्षण संस्थेचे संचालक मिलिंद सावंत तसेच सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब सातपुते व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात जागृती फाउंडेशन निर्मित जनसेवा कलापथक यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. शाहीर सिद्धार्थ सावंत यांनी महिला सक्षमीकरण, मुद्रा योजना, आरोग्य इत्यादी विषयांवर विविध गीतांमधून जनजागृती केली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संसाधन व्यक्ती श्रीमती जयश्री विनोद शेवाळ, शितल युवराज वाकळ, विद्या औताड, ग्रामसंघाचे अध्यक्ष अनिता रविंद्र जगताप, सचिव नीता रेवण वायफळकर, माणिक नगर ग्रामसंघाचे अध्यक्ष कुसूम भुजंग गागड, सचिव कल्पना ज्योतीराम दैन यांनी परिश्रम घेतले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result