महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
गॅस गळती होतेय? घाबरू नका...... कॉल १९०६ सोमवार, ३० ऑक्टोंबर, २०१७
ठाणे : घरगुती गॅस सिलिंडरमधून होणाऱ्या गॅस गळतीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते. मग ती आपल्या घरातली गळती असेल नाहीतर शेजारच्या घरातली. अशा वेळी तातडीने संपर्क साधण्यासाठी केंद्र सरकारने देशपातळीवर गेल्या वर्षी १९०६ हा एक हेल्पलाइन क्रमांक सुरू केला. त्याविषयी .......

देशाच्या कोणत्याही भागातून कोणत्याही वेळी या हेल्पलाइनवर संपर्क साधता येतो व तातडीने मदत मिळवता येते. दिवस रात्र ही सेवा सुरु असते. हिंदी, इंग्रजी व्यतिरिक्त मराठी, गुजराती, अशा ९ स्थानिक भाषांमधून ही सेवा मिळते. या कॉल सेंटरचे वैशिष्ट्य म्हणजे याचे काम वेब बेस्ड एप्लिकेशनद्वारे चालते. याद्वारे कॉल सेंटर कर्मचारी तुमचे लोकेशन तसेच जवळच्या गॅस वितरकाचे, मेकॅनिकचे लोकेशन शोधून थेट त्याला संदेश पोहचवतात. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या गॅसगळतीचा संदेश वितरक, मेकॅनिक यांनी काही कारणामुळे स्वीकारला नाही किंवा दूरध्वनी/मोबाईल कॉल्स उचलले नाहीत तर संबंधित कॉल अगदी थेट त्या भागातल्या पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यापर्यंत आणि प्रसंगी त्याही पुढच्या वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत थेट जाण्याची व्यवस्था असते मग तो दिवस असो किंवा अगदी मध्यरात्री. गॅस गळतीची माहिती कळताच संबंधित यंत्रणा सक्रीय होऊन केवळ तुमच्या मोबाईल किंवा दूरध्वनीवरील कॉलच्या आधारे तुमचे लोकेशन शोधून काढून तात्काळ कार्यवाही सुरु होते.

या कॉल सेंटर पोर्टलवर सातत्याने वितरक, मेकॅनिक्स, पोलीस, त्या त्या भागातले अग्निशमन दल यांची माहिती अद्ययावत केली जाते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result