महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पाचे जलपूजन शुक्रवार, ०१ डिसेंबर, २०१७
जलवितरण व बंद नलिका कामाचे भूमिपूजन

बीड -
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत वडवणी तालुक्यात कुंडलिका नदीवर बांधण्यात आलेल्या उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पाचे जलपूजन, जलवितरण व बंद नलिका प्रणाली कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले.

या कार्यक्रमांना राज्याच्या ग्रामविकासमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, जिल्हा परिषद अध्यक्ष सविता गोल्हार, वडवणीच्या नगराध्यक्षा मंगलाताई मुंडे, आमदार सर्वश्री जयदत्त क्षीरसागर, विनायक मेटे, आर. टी.देशमुख, भीमराव धोंडे, लक्ष्मण पवार, संगीताताई ठोंबरे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ए.पी.कोहीरकर, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक एच.ए.ढंगारे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एम.व्ही.कुलकर्णी, कार्यकारी अभियंता ए.आर.जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result