महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
राजर्षि छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कारांचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते वितरण शनिवार, १५ एप्रिल, २०१७
सांगली : सामाजिक न्याय विभागाअंतर्गत देण्यात येणाऱ्या राजर्षि छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता पुरस्काराचे वितरण पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार संजयकाका पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, अनुसूचित जाती कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार सुरेश खाडे, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, महानगरपालिका आयुक्त रविंद्र खेबुडकर, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले आदि मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यालयातील विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात हा पुरस्कार देण्यात आला. तालुकास्तरावर प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास 10 हजार, जिल्हास्तरावर 25 हजार, राज्याच्या बोर्डाच्या यादीमध्ये आल्यास 50 हजार, बोर्डात प्रथम क्रमांक आल्यास 1 लाख व राज्यात प्रथम क्रमांक आल्यास अडीच लाख रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यावेळी सुनिता बोर्डे यांचे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्री विचार व व्यसनाधीनता या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result