महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या हस्ते ध्वजारोहण बुधवार, ०१ मे, २०१९


परभणी :
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५९ व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त बुधवार दि.१ मे २०१९ रोजी सकाळी ८ वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम परभणी येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांच्या हस्ते संपन्न झाले.

याप्रसंगी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., महापालिका आयुक्त रमेश पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी परेडचे निरीक्षण केले. परेडमध्ये पोलीस दल, गृहरक्षक दल, पोलीस बँडपथक, सैनिक शाळा, स्काऊट व गाईडचे विद्यार्थी, बॉम्ब नाशक पथक, फॉरेन्सिक मोबाईल वाहन, आरोग्य विभागाचे वाहन व रुग्णवाहिका आदींचा समावेश होता. जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेला उद्देशून शुभेच्छा संदेशही यावेळी दिला. आदर्श तलाठी पुरस्कार सुदाम खुगे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी महादेव किरवले, उपजिल्हाधिकारी श्रीमती सुकेशिनी पगारे, यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, नागरिक, विद्यार्थी, पत्रकार आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result